शासकीय काम, अंगणवाडी सेविकेला सांग 

Government work, tell the Anganwadi worker
Government work, tell the Anganwadi worker

कोल्हापूर : लसीकरण कार्यक्रम आहे, अंगणवाडी सेविकांना सांगा, निवडणुकीचे काम आहे, अंगणवाडी सेविकांना बोलवा. सर्व्हेचे काम आहे, अंगणवाडी सेविकांकडे द्या, गावात मास्क वाटायचे आहेत, अंगणवाडी सेविकांना सांगा, काम महसूल विभागाचे, असो की आरोग्य विभागाचे अंगणवाडी सेविका हक्काच्याच आहेत.

अंगणवाडीचे काम करत ही कामे करण्यात त्यांचा दिवस जातो, पण मानधनाची वेळ आली की त्यांचे काम चार तास म्हणूनच कागदावर नोंदवले जाते. इतर कामाचे मिळणारे भत्तेही वर्षातून एकदाच मिळतात. सर्व कामे करणाऱ्या या महिलांना किमान वेतनाएवढेही मानधन दिले जात नाही. 
महापालिकेच्या क्षेत्रात सुमारे 210 अंगणवाडी सेविका आहेत. त्यांना मदतनीसही तेवढ्याच आहेत. सुमारे 1 हजार ते तेराशे लोकसंख्येच्या मागे एक अंगणवाडी आहे. प्रत्येक अंगणवाडीत सुमारे 20 ते 30 बालके असतात. काही अंगणवाड्यांतही संख्या 40 पर्यंत आहे. 

गरोदर मातांची नोंद ठेवून त्यांचा आहार, औषधे याची चौकशी करणे. स्तनदा मातांना धान्य पोहचवणे, अंगणवाडीत बालकांना शिकवणे, त्यांना नाष्टा, दुपारचे जेवण देणे, हे सेविकांचे मुख्य काम आहे; मात्र त्यांना अन्य कामेही लावली जातात. निवडणुकीच्या कामाचे वर्षातून एकदा पाच हजार रुपये दिले जातात; पण ते वेळेवर कधीच मिळत नाहीत. ती महिला ज्या प्रभागातील आहे त्याच प्रभागातील अंगणवाडीत त्याची सेविका म्हणून नियुक्ती करणे हा नियम आहे; मात्र अंगणवाडी सेविकांना कोणत्याही ठिकाणी जाऊन काम करावे लागते.

कागल, राशिवडे येथून काही महिला कोल्हापुरात येऊन काम करतात. त्यांचे अर्धे वेतन प्रवास भाड्यातच जाते. अंगणवाडी सेविकांना पूर्वी 25 रजिस्टर भरावी लागत होती. आता ती मोबाईलवर भरली जातात; पण एवढ्या नोंदी त्यांना ठेवाव्या लागतात. याशिवाय शासनाचे कोणतेही काम असले तरी ते या सेविकांनाच करावे लागते. हे सर्व करण्यासाठी त्यांना अत्यल्प मानधन मिळते. त्यांच्या अनुभवानुसार हे ठरले आहेत. सुमारे सहा हजार ते आठ हजार रुपये मानधनावर या महिला काम करतात. 

वर्षातील 350 दिवस काम 
अंगणवाडीत बालकांना आहार दिला जातो. त्यामुळे त्यांना सुटी घेता येत नाही. वर्षात त्यांना केवळ 15 दिवसांची सुटी असते. 350 दिवस या कार्यरत असतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com