
काल रात्रीपर्यंत हा खेळ सुरु राहिल्यानंतर आज पॅनेल जाहीर करुन प्रचाराचा शुभारंभ सुरु केला
कोल्हापूर : जिल्ह्यातील 433 ग्रामपंचायतींसाठी निवडणूकीच्या प्रचाराचा आज शुभारंभ करण्यात आला. गावपातळीवर कारभाऱ्यांनी ठिकठिकाणी छोटे-मोठे प्रचार शुभारंभाचा कार्यक्रम घेत आपलेच पॅनेल कसे विजयी होईल, गावासाठी आपण काय करणार याचा अजेंडा जाहीर करुन प्रचाराला सुरुवात केली.
जिल्ह्यात 47 ग्रामपंचायतींची बिनविरोध निवडणूक झाली आहे. उर्वरित ग्रामपंचायतींमध्ये मात्र पॅनेलमध्ये कोणाला उमेदवारी मिळणार यावरूनच आजपर्यंत धुमाकूळ सुरु होता. अखेर काल रात्रीपर्यंत हा खेळ सुरु राहिल्यानंतर आज पॅनेल जाहीर करुन प्रचाराचा शुभारंभ सुरु केला. प्रत्येकाने आपआपल्या प्रभागातच प्रचार करावा. प्रत्येक घरात आणि घरातील प्रत्येकापर्यंत उमेदवाराचे नाव, परिचय आणि चिन्ह गेले पाहिजे. एक-एका प्रभागात 20 ते 22 इच्छुक उमेदवार आहेत. तर एका एका प्रभागात दोन ते तीन पॅनेल आहेत. त्यामुळे चिन्ह पोचवणे आव्हानात्मक काम आहे. त्यामुळे, गावगारभाऱ्यांना आणि उमेदवारांना लोकांपर्यंत चिन्ह पोचवण्यासाठी पळापळ सुरु केली आहे. प्रचारासाठी केवळ सहा दिवस राहिले आहेत. यातही सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रत्येकाच्या घरोघरी जावून मतदारांना भेटावे लागत आहे.
हे पण वाचा - कोल्हापुरातील प्रसिद्ध फौजदारी वकील दिलीप मुंडरगी यांचे निधन
अजेंडा पत्रक, प्रचार पत्रक छापूण घेण्यासाठीही प्रेटिंग प्रेसमध्ये मोठी गर्दी होती. प्रत्येक प्रभागाती उमेदवार त्यांचे चिन्ह व त्यांचा अजेंडा असे हे पत्रक डिझाईन करुन घेण्यासाठी आर्टिस्टना चांगले काम मिळाले आहे. प्रत्येक गावातील गावकारभारी प्रत्येक प्रभागात जावून मतदारांना आवाहन करत आहेत. रस्ते, वीज, शुध्द पाणी, फिल्टर हॉऊस, घंटा गाडी, गार्डन, व्यायाम शाळा, सुसज्ज क्रीडांगण देवेन गावचा विकास करण्याचे वचन दिले जात आहे. त्यामुळे गावागावात आता ग्रामपंचायत निवडणूकीसाठी रंगत वाढली आहे.
संपादन - धनाजी सुर्वे