"गुरुदत्त शुगर्स'ची बांधिकीची परंपरा कायम

"Gurudatta Sugar's Tradition of Banking." kolhaput marathi news
"Gurudatta Sugar's Tradition of Banking." kolhaput marathi news

जयसिंगपूर (कोल्हापूर)  "गुरुदत्त शुगर्स'ने महापूर आणि कोरोनाच्या संकटावर मात करून 6 लाख 63 हजार 818 टन ऊसाचे गाळप केले आहे. पारदर्शी कारभार, उच्चांकी उस दर, विश्‍वासार्हता, कर्मचारी आणि मजूरांमधील दृढ नाते यामुळेच यंदाचा सोळावा गळीत हंगाम यशस्वी झाल्याचे प्रतिपादन, गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांनी व्यक्त केले.

टाकळीवाडी (ता. शिरोळ) येथील श्री गुरुदत्त शुगर्सच्या हंगामाच्या सांगता सभारंभात ते बोलत होते. त्यांनी अडचणीच्या काळात पालकमंत्री सतेज पाटील यांचे सहकार्य मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अधिकारी, कर्मचारी, तोडणी वाहतूक यंत्रणेची विशेष काळजी घेतली. मास्क, साबण, सानिटायझर तसेच हॅण्डवॉशची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. कारखाना परिसरात औषध फवारणी करण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे सहा हजार कामगारांची सोय करण्यात आली आहे.

संचारबंदी काळात प्रशासनाला जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक श्रीनिवास घाडगे, प्रांताधिकारी विकास खरात, तहसिहलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश बिरादार, किशोर काळे, पोलिस निरीक्षक चंद्रकांत निरावडे व दत्तात्रय बोरिगिड्डे तसेच ग्रामसमित्यांचेही श्री घाटगे यांनी आभार मानले. गळित हंगाम यशस्वी करण्यासाठी एक्‍झिक्‍युटीव्ह डायरेक्‍टर राहुल घाटगे, धीरज घाटगे, संचालक जे.आर.पाटील, धोंडीराम नागणे, बबन चौगुले, बाळासाहेब पाटील, संजय गायकवाड व आण्णासाहेब पवार यांनीही परिश्रम घेतले. 

14 गावात जंतुनाशक फवारणी 
कारखाना परिसरातील चौदा गावांमध्ये गुरुदत्त शुगर्सच्या व गुरुदत्त चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून जंतुनाशकांची फवारणी करण्यात आली. व्हाईट आर्मी, रेस्क्‍यू फोर्स टिमकडून दिवस-रात्र सर्व गावांमध्ये पेट्रोलिंग व जनजागृती करण्यात येत आहे. त्यांना लागणारे पेट्रोल, डिझेल, मास्क, सॅनेटायझर तसेच जीवनावश्‍यक वस्तूचे किटचेही वाटप केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com