आता सुरू असलेला कारभार खपवून घेणार नाही! ग्रामविकासमंत्री मुश्रीफ यांचा इशारा

hasan mushrif altimeter to kolhapur z p member
hasan mushrif altimeter to kolhapur z p member

कोल्हापूर - केंद्र शासनाने कालच विविध पुरस्कारांची घोषणा केली. त्यांना देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रांवर सह्या करत असतानाच मला कोल्हापूर जिल्हा परिषदेतील कारभाराच्या चौकशीचा आदेश काढावा लागला, ही माझ्यासाठी खेदाची गोष्ट आहे. त्यामुळे आता जो काही कारभार सुरू आहे तो खपवून घेणार नाही, असा इशारा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला.

पुढील वर्षी जिल्हा परिषद अव्वल राहील यासाठी शपथ घ्यावी, असे आवाहनही केले. विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वितरणाचा कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्ष बजरंग पाटील, खासदार प्रा. संजय मंडलिक, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार राजेश पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, शिक्षण सभापती प्रवीण यादव व पदाधिकारी उपस्थित होते. 

मुश्रीफ म्हणाले, ""मंत्री पदाचा कार्यभार स्वीकारून सहा महिने होत आहेत. यातील जेमतेम दोन महिने काम करता आले. उर्वरित कालावधी कोरोनाशी लढण्यात गेला. जो कालावधी मिळाला त्यात चांगले उपक्रम घेतले. बचत गटांसाठीचे सरस प्रदर्शन मुंबईत घेतले. तसेच जागतिक महिला दिनाचा राज्याचा कार्यक्रम कोल्हापुरात घेतला. दुसऱ्या बाजूला सत्तेत आल्यापासून जिल्हा परिदेतील चित्र मात्र काही वेगळेच आहे.'' 

सर्वसाधारण सभा कारण नसताना आणि मी आवाहन करूनही वादग्रस्त झाली. जिल्हा परिषदेत सतत खरेदीच सुरू आहे. ही उठसूठ खरेदी बंद करा. जी खरेदी झाली ती योग्य आहे का, त्याचा वापर योग्य होतो का, हेदेखील तपासून बघणे आवश्‍यक असल्याचेही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले. 

महिन्याला सभा घ्या 
जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा तीन महिन्यांतून एकदाच झाली पाहिजे, असा काही नियम नाही. ही सभा दर महिन्याला घ्या. सभागृहात 50 लोकांना बसण्याची परवानगी आहे. चिठ्ठ्या टाकून 50 लोकांची नावे निश्‍चित करा; पण विनाकारण गोंधळ, दंगा घालू नका. विकासकामे करा. लोकांनी विकासकामांसाठी सभागृहात पाठवले आहे. तसेच रस्सा मंडळ बंद करा. कोरोनाशी लोक लढत असताना तुम्ही रस्सा मंडळ करता, हे लोकांना पटणारे नाही. फार तर मी सर्किट हाऊसमध्ये तुमच्या जेवणाची व्यवस्था करतो, असा टोलाही मंत्री मुश्रीफ यांनी लगावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com