हातकणंगले गुरूवारपासून पूर्ण "लॉक', पण आरोप आणि विरोध...

Hatkanangale completely "locked" from Thursday
Hatkanangale completely "locked" from Thursday

हातकणंगले : आसपासच्या गावांतील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर गुरुवारपासून (ता. 16) ते रविवारपर्यंत (ता. 19) हातकणंगले चार दिवस पूर्णतः लॉकडाउन ठेवण्याचा निर्णय नगरपंचायतीने घेतला आहे. दरम्यान, कोणालाही विश्‍वासात न घेता परस्परच एकतर्फी निर्णय लादल्याचा आरोप करीत व्यापाऱ्यांनी याला विरोध केला. यावरून पदाधिकारी आणि व्यापाऱ्यांत वादावादी झाली. 

चार महिन्यांत परगावाहून आलेल्या परप्रांतीयाचा अपवाद वगळता हातकणंगलेत कोरोनाचा रुग्ण सापडलेला नाही. त्यामुळे काही अंशी सर्वच जण गाफील असून, सोशल डिस्टन्सिंग, मास्क अशा उपायांचा फज्जा उडाला आहे. याचवेळी इचलकरंजीसह आसपासची गावे कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहेत. त्यामुळे परत एकदा प्रशासनाची चिंता वाढली. या पार्श्वभूमीवर हातकणंगलेत चार दिवस लॉकडाउन करण्याचा निर्णय आज प्रशासनाने घेतला. मात्र चार महिने व्यवसायांवर संक्रांत आली असून, रोजीरोटीचा ताळमेळ घालताना नाकीनऊ येत आहे. अशातच प्रशासन व पदाधिकाऱ्यांनी विश्‍वासात न घेता परस्पर निर्णय लादल्याचा आरोप व्यापाऱ्यांतून होत आहे. याचा जाब विचारण्यासाठी व्यापारी नगरपंचायतीत गेले असता पदाधिकारी व व्यापाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. 

परिसरातील गावांत कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याच्या सूचना वरिष्ठ कार्यालयाकडून आल्या आहेत. त्यामुळे जनहिताचा विचार करून लॉकडाउनचा निर्णय घेतला आहे. 
- अरुण जानवेकर, नगराध्यक्ष 

कोरोनाच्या काळात हातकणंगलेत ज्या वेळी लॉकडाउन केले, त्या वेळी परस्परच निर्णय घेतले गेले. अशा वेळी नागरिक, डॉक्‍टर, व्यापारी, भाजीविक्रेत्यांना विश्वासात घेणे आवश्‍यक होते. मात्र, प्रशासन व पदाधिकारी तेव्हा पण आणि आजही तसेच वागत आहेत. 
- एक व्यापारी 


संपादन : प्रफुल्ल सुतार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com