व्हिडीओ : कोल्हापूर जिल्हयातील धबधबे लॉकडाउन ; पंचगंगा नदी घाटावर वर्षाप्रेमींची गर्दी...

 Heavy rains lashed the district for two to four days in kolhapur disrtict
Heavy rains lashed the district for two to four days in kolhapur disrtict

कोल्हापूर - जिल्ह्यात दोन चार दिवस दमदार पावसाने हजेरी लावली आहे. गतवर्षी जिल्ह्यात पुरामुळे हाहाकार माजवला होता. त्यामुळे यंदाचा पाउस काय करतो याकडे शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागून राहीले आहे. यावर्षी कोरोनामुळे नागरिक दोन महिने लॉकडाउन झाले होते. आता लॉकडाउन शिथील झाल्यानंतर नागरीक रस्त्यावर येण्यास इच्छुक आहेत. पण जिल्ह्यातील आंबोली आणि राऊतवाडी यासह सर्व पर्यटन केंद्रे मात्र लॉकडाउन आहेत.नागरिक मात्र पावसाचा आनंद घेण्यास उत्सुक आहेत.

राजाराम बंधारा पाण्याखाली

शहरात अधून मधुन येत असलेल्या धो धो पावसामुळे काही रस्त्यावरुन वेगाने पाणी वहात आहे. अनेक ठिकाणी ड्रेनेजचे काम सुरू असल्याने मातीमुळे या पाण्यालाही लालभडक रंग आला आहे. जिल्ह्यातील नदी नाले दूथडी भरुन वाहात आहेत. पंचगंगा नदीने 25 फ़ूटाची पातळी गाठली आहे. कसबा बावड्यातील राजाराम बंधारा पाण्याखाली गेला आहे बंधाऱ्यावरुन तीन फ़ूट पाणी वहात आहे. त्याच प्रमाणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शिंगणापूर पाणी उपसा केंद्राजवळील बंधाराही पाण्याखाली गेला आहे. या बंधाऱ्यावरुन वाहणारे पाणी अगदी धबधब्यासारखे दृश्‍य दिसत आहे. त्यामुळे रामतीर्थ धबधब्याप्रमाणे रस्त्यावरुन नदीत कोसळणारे लालभडक पाणी पाहण्यासाठी नागरिक नदीकाठाला गर्दी करत आहेत. यामुळे हे एक पर्यटन केंद्रच रुपाला येत आहे.

शहरातही पंचगंगेचे पाणी घाटावरील हनुमान मंदिराच्या पायरीला लागले आहे. नदीच्या पाण्यात वाढ झाल्यामुळे पात्रातील मंदिरेही पाण्याखाली गेली आहेत. नदीपात्रात नेहमी पोहण्यास येणाऱ्या युवकांनी पंचगंगेच्या लालभडक पाण्यात सुर मारत पुराच्या पाण्यात पोहण्याचा आनंद लुटण्यास सुरवात केलीय. दुथडी भरुन वाहणाऱ्या नदीचे पाणी पाहण्यासाठी सकाळ सायंकाळ करवीरवासीय पंचगंगा घाटावर हजेरी लावत आहेत. पंचगंगा घाटावर पाण्यात सुर मारण्याची युवकांच्यात जणू स्पर्धाच लागलेली असते. मंदिराजवळच्या कठड्यावरुन पाण्यात रांगेने सुर मारताना तरुणाना पाहण्यासाठीही अनेक नागरिक घाटावर येत असतात. गणपती बाप्पा मोरया म्हणत नदीपात्रात उडी मारून प्रवाहासोबत पोहत दीपमाळेजवळ पोहत जावून किनारा गाठत असतात. नदीचे पाण्याने पंचगंगा घाटासमोरील झाडांची हद्द सोडली. शेताशेतातून पाणी पसरले आहे. दरवर्षी पिकनीक सेंटरवरून नदीपात्र आणि मंदिरे पाहण्यासाठी दरवर्षी नागरीकांची गदीं होत असते. पण यंदा कोरोनामुळे बागा बंद आहेत. त्यामुळे पिकनीक सेंटरवरून नागरिकांना पुराचे पाणी पाहता येणार नाही. यंदा जुन्या शिवाजी पुलावरून पाणी पाहण्यास मर्यादित स्वरूपात परवानगी दिली तर नागरिकांना पंचगंगेचे रुप पाहता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com