एसटी कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतनासाठी मदत करा...

Help ST employees get full pay
Help ST employees get full pay

कोल्हापूर : एसटी कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन मिळण्यासाठी राज्य शासनाने एसटी महामंडळाला आर्थिक मदत करावी, अशी मागणी राज्य मान्यताप्राप्त एसटी कर्मचारी संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

निवेदनातील माहिती अशी की, कोरोना संसर्ग टाळण्यासाठी पुकारण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे एसटी प्रवासी वाहतूक बंद आहे. त्यामुळे एसटी महामंडळाचा दिवसाकाठी 23 कोटींचा महसूल बुडतो आहे. तरीही अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी एसटी महामंडळाने प्रवासी सेवा दिली आहे. 

मात्र, कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के वेतन देण्यात येत आहे. अशात एप्रिल व मे महिन्याचे वेतन अर्धवट मिळाले आहे. यातून एसटी कर्मचाऱ्यांची कोंडी होत आहे. अन्य राज्यातील परिवहन सेवेत राज्य सरकारने आर्थिक मदत केली आहे. त्याच धर्तीवर राज्य शासनानेही आर्थिक मदत करावी, अशी अपेक्षा एसटी कर्मचारी संघटनेची आहे. 

संघटनेचे राज्याध्यक्ष संदीप शिंदे व सरचिटणिस हनुमंत ताटे यांनी हे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com