कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर "हेल्पर्स'ची स्मार्ट मास्क "हेल्प'..! 

Helpers Handicapped Orgnization Help Doctors On Corona's background..! Kolhapur Marathi News
Helpers Handicapped Orgnization Help Doctors On Corona's background..! Kolhapur Marathi News

कोल्हापूर : येथील हेल्पर्स ऑफ हॅन्डिकॅप्ड ही संस्था म्हणजे अपंगांच्या शिक्षण आणि पुनर्वसनासाठीची हक्काची संस्था. समाजात कोणतीही आपत्ती आली, की आपल्या परीने ही संस्था योगदान देत असते. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सध्याच्या परिस्थितीमध्येही ही संस्था आरोग्यदूतांच्या सुरक्षिततेसाठी पुढे सरसावली असून आरोग्य सेवा देणाऱ्यांना चांगल्या प्रतीचे स्मार्ट मास्क संस्थेने उपलब्ध केले आहेत. 

दरम्यान, संचारबंदीमुळे संस्थेची शाळा आणि इतर आस्थापना बंद असल्या तरी निवासी कर्मचारी वर्ग संस्थेतच कार्यरत आहे. या मंडळींनी सर्व आरोग्यदूतांना मास्क पुरवण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी ते प्रसंगी जादा तास काम करत आहेत. 

कोरोनाच्या संक्रमण काळात आजवर शहर आणि जिल्ह्यात सुमारे लाखांवर मास्क उपलब्ध झाले आणि त्याचे विविध घटकांपर्यंत वितरण झाले. येत्या काळात संक्रमणाचा टक्का आणखी वाढणार असून मास्कची मागणी आणखी वाढणार असल्याची शक्‍यता गृहीत धरून "हेल्पर्स'ची टीम आपला खारीचा वाटा उचलण्यासाठी पुढे सरसावली आहे. संस्थेमध्ये 1993 पासून व्यवसाय प्रशिक्षण केंद्र सुरू आहे. तेथे या शाळेतच शिकलेल्या आणि पुढे पुनर्वसनाचा भाग म्हणून व्यवसाय प्रशिक्षण केंद्रात काम करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यातील शिलाई मशीन विभाग "मास्क'साठी काम करतो आहे. सुरवातीच्या टप्प्यात "सीपीआर'मध्ये मास्क पुरवण्यात आले असून हळूहळू महापालिकेची हॉस्पिटल्स, सेवा रुग्णालय आदी ठिकाणी मास्क पुरवले जाणार आहेत. 

असाही इतिहास 
अपंग पुनर्वसनाचे भरीव कार्य करणाऱ्या या संस्थेने "वुईथ टॉयलेट स्कूल बस'सारख्या अनेक वैविध्यपूर्ण संकल्पना राबविल्या आणि पुढे त्या राज्यभरात अनुकरणीय ठरल्या. संस्थेतील विद्यार्थ्यांना पंचवीस वर्षांपूर्वी शाळेसाठी लांबचा पल्ला गाठावा लागायचा. त्यामुळे स्कूल बसमध्येच टॉयलेटची व्यवस्था संस्थेने केली होती. ही संकल्पना राज्यभर चर्चेची ठरली होती. अपंगांसाठी काम करता करता समाजातील इतर घटकांसाठीही ज्या गोष्टी शक्‍य आहेत, त्या करण्यावर संस्थेने भर दिला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com