आर्थिक चणचणीमुळे लॉकडाउनमध्ये झाले "चोरी छुपे' बाल विवाह 

"hidden" child marriages in lockdown
"hidden" child marriages in lockdown

कोल्हापूर : दुर्गम भागात एक शेतकरी. त्याची पत्नीही त्याच्यापासून अलिप्त झाली. मुलगीचा सांभाळ आजीच करते. मुलीचे दहावी पर्यंतचे शिक्षण झाले. त्या कोरोनाच संकटाने घरची आर्थिक परिस्थिती खालावली. मुलीला नाईलाजाने शहरातील नातेवाईकाकडे पाठवले. मुलीची जबाबदारी कमी करण्यासाठी तिच्या लग्नाची बोलणी सुरू झाली. तसं तिचे लग्नही जमलं. पण ती अल्पवयीन. चोरी छुपे तिचे दोनाचे चार हात करण्याची तयारी सुरू झाले.

साहित्याची खरेदीही करण्यात आली. दरम्यान, ही गोष्ट "चाईल्ड लाईन'च्या कानावर आली. पोलिसांच्या मदतीने त्यांनी हा बालविवाह वेळीच रोखला. मुलीचे शिक्षण त्याचे महत्व पटवून देऊन त्यांनी वडीलांचे डोळे उघडले. 

हे झालं एक प्रातनिधिक उदाहरण. जिल्ह्यात असे प्रकार घडत असतात. कोरोना संकटाने लॉकडाउन लागू झाला. तसे अनेकांचे रोजगार गेले. व्यवसाय बुडाले, हाताला काम नाही. घरात एकाला चार-पाच तोंड खायचं काय? करायचं काय? असा प्रश्‍न आज अनेकांसमोर उभा आहे. त्याच घरात नववी दहावीची मुलगी आहे. तिचे दोनाचे चार हात करून दिले, की घरातील एक माणूस आपोआप कमी होईल, अशी मानसिकता वाढत आहे. हे कारण आज बाल विवाहाला खतपाणी घालत आहे. तसेच परिस्थितीने आई-वडीलांना कामाला जावे लागते.

वयात आलेली मुलगी घरी एकटीच असते. मुलीच्या हातून चुकीचे पाऊल पडणार तर नाही ना ? त्यातून कुटुंबाची बदनामी होईल, अशा असुरक्षीत आणि सामाजिक भितीचे वातावरण हे आज बालविवाहाचे कारण ठरत आहेत. लॉकडाऊन काळात केवळ खालावलेल्या आर्थिक परिस्थितीने होणारे नऊ बालविवाहाचे प्रयत्न चाईल्ड लाईन संस्थेने वेळीच हाणून पाडले. प्रेम संबधाला बालविवाह हा पर्याय नाही. याचीही जाणून अल्पवयीन मुला-मुलींमध्ये करण्याचे काम संस्थेकडून केले जात आहे. 

चाईल्ड लाईन संस्थेमार्फत कारवाईची मोहीम राबवून अगर आलेल्या तक्रारीनुसार बालविवाह रोखण्याचे काम करते. या संबधी तक्रार आली तर त्याची शहानिशा करून स्थानिक पोलिसांच्या मदतीने बालविवाहाला आळा घालण्याचे काम सक्षमपणे करण्याचे काम ही संस्था करीत आहे. तसेच संबधित पालकांचे प्रबोधन, समुपदेश करण्याचेही कामही या संस्थेमार्फत केले जाते. 

बालविवाह रोखण्याचे स्वरूप 
गतवर्षी - 24 
या वर्षी लॉकडाऊन काळात - 10 

खालावलेली आर्थिक परिस्थिती, असुरक्षीत आणि सामाजिक भितीचे वातावरण यातूनच बालविवाह करण्याचे प्रयत्न होत असल्याचे प्रकार पुढे येत आहेत. संबधित पालकांचे वेळीच समुपदेश, प्रबोधन हा त्यावरचा उपाय आहे. हे काम चाईल्ड लाईनद्वारे केले जाते. 
- अनुजा खुरंदळ, समन्वयक, चाईल्ड लाईन. 


दृष्टिक्षेप
- लॉकडाउनमध्ये काम नसल्याने आर्थिक चणचण 
- मुलीच्या हातून चुकीचे पाऊल पडू नये, यासाठीही घाई 
- नऊ बालविवाहांचे प्रयत्न चाईल्ड लाईन संस्थेने वेळीच रोखले 
- प्रेम संबधाला बालविवाह हा पर्याय नसल्याचीही जाणीव करून दिली 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com