कसा साकारला रणरागिणी ताराराणींचा अश्‍वारूढ पुतळा? 

history of tararani statue in kolhapur
history of tararani statue in kolhapur
Updated on

कोल्हापूर शहरात प्रवेश करताना आपण सर्वात पहिल्यांदा नतमस्तक होतो, ते रणरागिणी ताराराणी यांच्या पुतळ्यासमोर. या अश्‍वारूढ भव्य पुतळ्यामुळेच स्वागतालाच कलापूर कोल्हापूरची साक्ष मिळते. हा पुतळा कुणी साकारला आणि त्यामागील रंजक कहाणी आहे तरी नेमकी काय? 

प्रख्यात चित्रकार, शिल्पकार रवींद्र मेस्त्री यांनी हा पुतळा साकारला. त्यांची असंख्य पोट्रेट, निसर्गचित्रे जशी भावतात, तशीच त्यांची शिल्पकलाही वेगळीच आनंदानुभव देणारी. पन्हाळगडावरील बाजीप्रभू देशपांडे, हुतात्मा पार्कातील स्वामी विवेकानंद यांचा पुतळा असो रणरागिणी ताराराणींच्या पुतळ्याचे किमयागारही तेच. 

कोल्हापुरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

रवींद्र मेस्त्री यांच्याकडे रणरागिणी ताराराणी यांच्या पुतळ्याचे काम सुरू होते. त्यासाठी मॉडेल म्हणून त्यांच्यासमोर तत्कालीन प्रसिद्ध अभिनेत्रींसह अनेक नावे होती; पण या नावांवर त्यांचे शिक्कामोर्तब होतच नव्हते. अनेक दिवस केवळ अशा मॉडेलना भेटण्यात आणि त्यांची छायाचित्रे पाहण्यातच गेली; पण लवकर निर्णय होत नव्हता. कारण त्यांना या पुतळ्यासाठी एका क्षणात ताराराणींची आठवण व्हावी, असे मॉडेलच हवे होते. एका कामानिमित्त ते शिवाजी उद्यमनगरात आले. तेथे स्क्रॅप गोळा करण्यासाठी आलेल्या धरमाबाई शिंदे त्यांना दिसल्या आणि कैक दिवस शोधत असलेले मॉडेल त्यांना मिळाले. रवींद्र मेस्त्रींनी पुतळ्याबाबतचा विषय त्यांना सांगताच धरमाबाईंनीही क्षणार्धात संमती दिली आणि पुढे रणरागिणी ताराराणींचा हा भव्यदिव्य पुतळा आकाराला. धरमाबाई या यादवनगरात राहायच्या. 22 मे 2010 मध्ये रवींद्र मेस्त्री यांच्या पंधराव्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून त्यांच्या विविध कलाकृतींवर आधारित छायाचित्रांचे प्रदर्शन शाहू स्मारक भवनात भरवण्यात आले होते. यानिमित्ताने धरमाबाई यांचा जाहीर सत्कार केला होता. यानिमित्ताने नव्या पिढीला धरमाबाईंशी संवाद साधता आला होता.

अगदी अलीकडेच जुलै 2016 मध्ये त्यांचे निधन झाले. मात्र, करवीरच्या शौर्यशाली इतिहासाच्या साक्षीदार म्हणून पुतळ्याच्या रूपाने त्यांच्या स्मृती आजही चिरंतन आहेत, हे नक्की. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sahyadri Express
Kolhapur flood situation latest
Bay of Bengal Weather System Maharashtra Rain Alert
Panhala Police Act Swiftly After Huge Tree Falls Across Main Road
Marathi News Esakal
www.esakal.com