ऐतिहासिक पावनगडावरील  शेकडोच्या संखेने सापडलेल्या तोफ गोळ्यांचे झाले स्थलांतर 

Hundreds of artillery shells found on the historic Pavangada were evacuated kolhapur marathi news
Hundreds of artillery shells found on the historic Pavangada were evacuated kolhapur marathi news

आपटी (कोल्हापूर) : ऐतिहासिक पन्हाळगडाचा जोड किल्ला असलेल्या  पावनगड येथे अनेक वर्षापासून येथील दर्ग्याजवळ असलेल्या तट बंदी वर दोन तोफा होत्या. त्या तोफा तेथून स्थलांतरित करून अन्य ठिकाणी ठेवण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी खुप प्रयत्न केले.आज त्या तोफाचे स्थलांतर करण्यात सह्याद्री प्रतिष्ठानच्या मावळ्यांना यश आले.


  ऐतिहासिक पावनगड येथे शिवकालीन ऐतिहासिक वास्तू आहेत. त्यामुळे येथे आजही तोफा व तोफ गोळे यासारखी युद्ध सामुग्री येथे आढळते. सह्याद्री प्रतिष्ठानाचे मावळे महिन्यातून एकदा पन्हाळगड-पावनगड मोहीम करतात. या मोहिमे दरम्यान ते शिवकालीन वास्तू व वस्तूंची स्वच्छता करतात.असेच दिशादर्शक फलक लावण्यासाठी काही दिवसांपूर्वी येथील महादेव मंदिरा परिसरात खड्डा काढत असताना शेकडोच्या संखेने  तोफ गोळे सापडले होते. त्यामुळे सह्याद्री प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी महादेव मंदिरा समोरील पटांगणात त्या तोफा बसवण्याचा निर्णय घेतला.

प्रतिष्ठानच्या या निर्णयास स्थानिक लोकांनी व गडाच्या मानकऱ्यांनी सहमती दर्शवली. त्यानुसार आज प्रतिष्ठानच्या  मावळ्यांनी लाकडी तोफगाडे बनवून त्यात त्या तोफांची स्थापना केली.स्थलांतरित केलेल्या तोफा दर्ग्याजवळ असल्याने येथे पर्यटकांना जाण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे त्या तोफा तेथून स्थलांतरित करण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी खुप प्रयत्न केला.

अखेर त्यांच्या प्रयत्नांनाआज यश आले. तोफा महादेव मंदिरा समोर ठेवल्याने हौशी पर्यटक, शिवभक्त व इतिहास प्रेमींना पहाता येणार आहेत.या कामी सह्याद्री प्रतिष्ठान कोल्हापुर विभागाचे दुर्गसेवक व शिवभक्तांनी परिश्रम घेतले. यावेळी गौरव जाधव,अक्षय चौगुले,विशाल तांबेकर,अभिजीत भालबर,सोमनाथ गुरव,नयन कांबळे,सचिन डवरी,योगेश लटींगे,सुरज शेटके,गणेश चोपडे,सचिन पाटील,ओम साठे,नासिर मुजावर,दिग्विजय रेंदाळे,शुभम जाधव,राम लाड,योगेश पुजारी,महादेव भोसले,साहिल मणेर,प्रसाद कोतमिरे  सह्याद्री प्रतिष्ठान कोल्हापुर विभागाचे दुर्गसेवक उपस्थित होते.
     

 लोकसहभागातून केली तोफा गाड्याची निर्मिती
 तोफा बसविण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी लोक सहभागातून अंदाजे साठ ते सत्तर हजार रुपये गोळा करून सागवानी लाकडाचे दोन तोफा गाडे बनवून घेतले आहेत.

संपादन- अर्चना बनगे
   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com