वाढदिवसाच्या शुभेच्छा न दिल्याने पत्नीला हॉकी स्टीकने मारहाण 

husband beaten hockey stick to wife in kolhapur
husband beaten hockey stick to wife in kolhapur

कोल्हापूर - सध्या कधी काय होईल सांगता येत नाही. पती-पत्नीत कोणत्या कारणाने वाद होतील याचा तर अलिकडे नेमच नसतो. कोल्हापुरातील बावड्यातही नुकतीच अशीच एक घटना समोर आली आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा न दिल्याच्या रागातून पतीने पत्नीला हॉकी स्टीकने केलेल्या मारहाण केली आहे. या मारहाणीत पत्नी जखमी झाली आहे. ताराबाई पार्क येथे हा प्रकार घडला असून याबाबत मेघा अशोक जाधव (रा. ताराबाई पार्क) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रणव मिलिंद देशपांडे (मूळ रा. सांगली, सध्या रा. कसबा बावडा) आणि तक्रारदार मेघा जाधव हे दोघे पती-पत्नी आहेत. दोघांत वारंवार वाद होतात.

शुक्रवारी प्रणवचा वाढदिवस होता. त्याच्या शुभेच्छा मेघा यांनी दिल्या नसल्याचा राग मनात धरून त्याने मोपेडवरील हॉकी स्टीकने त्यांना बेदम मारहाण केली. त्यात त्या जखमी झाल्या. अशी तक्रार जाधव यांनी शाहूपुरी पोलिसात दिली. त्यानुसार प्रणववर गुन्हा नोंद करण्यात आला. 

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com