esakal | मोकाट जनावरांच्या मालकांवर इचलकरंजीत होणार कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

Ichalkaranji Municipality Will Take Action Against The Owners Of Animals Kolhapur Marathi News

अनेक वर्षांपासून प्रलंबित मोकाट जनावरांचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे. याबाबत बुधवारी नगरपालिकेत नगराध्यक्षा अलका स्वामी यांच्या उपस्थितीत बैठक झाली.

मोकाट जनावरांच्या मालकांवर इचलकरंजीत होणार कारवाई

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

इचलकरंजी : अनेक वर्षांपासून प्रलंबित मोकाट जनावरांचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे. याबाबत बुधवारी नगरपालिकेत नगराध्यक्षा अलका स्वामी यांच्या उपस्थितीत बैठक झाली. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी योग्य उपाययोजनांबाबत चर्चा झाली. शहरात मोकाट फिरणारी जनावरे ज्यांची आहेत, त्या संबंधित मालकांनी जनावरे ताब्यात घ्यावीत, अन्यथा कारवाई केली जाईल, असे आवाहन इचलकरंजी नगरपालिकेने केले आहे. 

काही दिवसांपूर्वी शहर वाहतूक सल्लागार बैठकीत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मोकाट जनावरांच्या बंदोबस्ताची मागणी केली होती. या पार्श्‍वभूमीवर कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मोकाट जनावरांच्या प्रश्नासाठी पालिकेत बैठक झाली. मोकाट जनावरांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी विस्तृत चर्चा केली. शहर व परिसरातील गो शाळांमध्ये जनावरांना आसरा देण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केला आहे, मात्र ही जनावरे सांभाळण्यासाठी गोशाळांची आर्थिक तरतुदीची मागणी आहे.

त्यामुळे हा प्रश्न प्रलंबित असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. मोकाट जनावरांसाठी शहरात जागा उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक निर्णय झाला. सध्या जनावरांच्या मालकांना शहरात फिरणारी जनावरे ताब्यात घेण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. तसेच पुढील टप्प्यात या जनावरांना सांभाळण्यासाठी गो शाळांचे प्रस्ताव घेतले जाणार आहेत. 28 जानेवारीला पुन्हा याबाबत व्यापक बैठक घेण्याचे ठरले आहे. 

बैठकीस उपमुख्याधिकारी केतन गुजर, आरोग्य सभापती संजय केंगार, पाणीपुरवठा सभापती दीपक सुर्वे, नगरसेवक शशांक बावचकर, आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार, स्वच्छता निरीक्षक विजय पाटील, सर्जेराव पाटील, संजय बागडे आदी उपस्थित होते. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur