तुम्ही आर्टिस्ट आहात, मग हे बोधचिन्ह बनवा अन् ५० हजार रूपये जिंका!

सदानंद पाटील
Tuesday, 15 September 2020

कोल्हापूर: राज्य पाणी व स्वच्छता मिशनसाठी ग्रामीण पाणी पुरवठा आणि ग्रामीण स्वच्छता या विषयाच्या अनुषंगाने बोधचिन्ह तयार करण्यासाठी राज्यात बोधचिन्ह स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा असे आवाहन राज्य पाणी व स्वच्छता मिशनच्या अभियान संचालक आर. विमला यांनी केले आहे. 

स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी तयार केलेले लोगो व ब्रीदवाक्‍य 30 सप्टेंबरपर्यंत राज्यस्तरावर पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विजेत्या स्पर्धकाला 50 हजार रुपयांचे रोख बक्षीस मिळणार आहे. ग्रामीण पाणी पुरवठा व ग्रामीण स्वच्छता या विषयांचा सहज बोध होईल, अशा पध्दतीने लोगो करण्यात यावा तसेच ब्रीदवाक्‍य हे मराठीतच असणे बंधनकारक राहणार आहे. 

या स्पर्धेत व्यक्ती, संस्था, जाहिरात संस्था सहभागी होऊ शकणार आहेत. हे बोधचिन्ह एकरंगी, बहुरंगी प्रकारात असला तरी चालेल. सहभागी स्पर्धकाने लोगोची सॉफ्ट कॉपी पाठविणे आवशक्‍य आहे . त्यासोबत स्पर्धकांची संपूर्ण माहिती उदा. नाव, पत्ता , संपर्क क्रमांक इ . असणे आवश्‍यक आहे. तरी या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातून जास्तीत जास्त स्थानिक कलाकार , शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी केले.

संपादन ः यशवंत केसरकर

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: If you are an artist, make a logo, then read this news