सरकारचा दुजाभाव : ''अंबानींसाठी एक न्याय आणि खाशाबा जाधव यांच्यासाठी एक न्याय''

मतीन शेख
Friday, 18 September 2020

राजू शेट्टी फेसबुक अकांऊट वरुन त्यांनी या संबंधी पोस्ट केली आहे.

कोल्हापूर : स्वतंत्र भारताचे पहिले ऑलिम्पिकवीर 'खाशाबा जाधव' यांना १९५२ मध्ये हेलसंकी येथे ऑलिम्पिक पदक मिळालं, ही कोल्हापूर आणि महाराष्ट्रासाठी सन्मानाची बाब आहे. अशा व्यक्तीला मरणोत्तर पद्मभूषण मिळावे यासाठी राज्य सरकारनेसुद्धा शिफारस करणं गरजेचं आहे.अशी मागणी शेकतरी नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. आपल्या फेसबुक अकांऊट वरुन त्यांनी या संबंधी पोस्ट केली आहे. #PadmaForKhashabaJadhav हा हॅश टॅग वापरत त्यांनी ही पोस्ट केली आहे. 

 

या पोस्ट मध्ये पुढे ते म्हणाले, 'माझ्या लोकसभेच्या 2009-2014 या कार्यकाळात मी तत्कालीन पंतप्रधान व राष्ट्रपती यांना पत्र लिहीलं,गृहमंत्री चिदंबरम यांना भेटलो आणि खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्मभूषण देण्याची विनंती केली, पण चिदंबरम यांनी सांगितले कि हे नियमात बसत नाही,नियमानुसार एखादी व्यक्ती मयत झाल्यानंतर 6 महिन्याच्या आत त्यांना पद्मभूषण द्यावे लागते. या नियमामुळे 'खाशाबा जाधव' यांचा मरणोत्तर सन्मान रखडला.पुन्हा माझ्या लोकसभेच्या 2014-2019 कार्यकाळात, मोदी सरकार कडून 'धीरुभाई अंबानी' यांना मृत्युनंतर 11 वर्षांनी 'पद्मभूषण' देण्यात आला. म्हणजे केंद्र सरकार अशा वेळी कोणतेही नियम पाळत नाही हे माझ्या निदर्शनास आलं. त्यानंतर मी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 'खाशाबा जाधव' यांची केंद्र सरकारकडे शिफारस करण्यास सांगितले.

https://www.facebook.com/20531316728/posts/10154009990506729/

हेही वाचा- महिलांनो मायक्रो फायनान्स कंपनीत कर्ज  घेऊन अडकला आहात..? तुम्हाला होईल मदत  राज्यस्तरिय अभ्यासगटाची -

तत्कालीन गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांची भेट घेतली, अहिर हेही कुस्ती शौकिन आहेत,केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचीही भेट घेवून खाशाबा जाधव यांची पद्मभूषण साठी शिफारस केली, पण हा प्रश्न केंद्राकडून गांभिर्याने घेतला नाही. अंबानींसाठी एक न्याय आणि खाशाबा जाधव यांच्यासाठी एक न्याय, हा केंद्र सरकारने केलेला दुजाभाव कोल्हापूरकरांसाठी शरमेची बाब आहे. या सर्व घटनां दरम्यान 'खाशाबा जाधव' यांचे सुपुत्र रणजीत हेही माझ्यासोबत होते. वडिलांनी देशाचा सन्मान राखला, पण सरकारकडून अशा व्यक्तिंची होणारी कुचेष्टा थांबली पाहिजे, असं मला वाटतं. 'खाशाबा जाधव' यांना आतातरी पद्मभूषण द्यावा आणि त्यासाठी राज्य सरकारने त्याची शिफारस केंद्राकडे करावी. खाशाबा जाधव यांना पद्मभूषण न देणे हा तमाम कुस्तीशौकिनांचा अपमान ठरेल.अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: independent India first Olympic Khashaba Jadhav should be given Padma Bhushan Demand for Raju Shetty