जखमी "काळा शराटी'स मिळाले जीवदान 

जखमी "काळा शराटी'स मिळाले जीवदान 

वारणानगर : बहिरेवाडी (ता. पन्हाळा) येथे विजेच्या खांबाला धडकून जखमी झालेल्या काळा शराटी या पक्षाला चावरे(ता. हातकणंगले) येथील पक्षी अभ्यासक व्‌ वाईल्ड लाईफ कॉन्सर्व्हेशन अँन्ड रिसर्च फाउंडेशनचे अध्यक्ष युवराज पाटील यांनी उपचार केल्याने जीवनदान मिळाले. 

काळा शराटी जखमी झाल्यानंतर येथील समर्थ प्रदीप जाधव या चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने कुत्र्यापासून बचावासाठी घरात आणले. प्रदीप जाधव यांनी जखमी पक्षाला वाचवण्यासाठी सोशल मीडियावरुन पशुप्रेमीना आवाहन केले. 

युवराज पाटील यांनी जाधव यांचेशी संपर्क साधून रात्री दहा वाजता जखमी पक्षी ताब्यात घेतला. रात्री उशिरा तळसंदे येथील जनावरांच्या दवाखान्यात डॉक्‍टरांना भेटले. त्यांनी इलेक्‍टोरोल पावडर मेडिकल पाण्याद्वारे पाजण्यास संगितले. दुसऱ्या दिवशीजी उपचार केले. त्यानंतर सव्वा नऊ वाजता त्याला खाद्य दिले. शराटी पक्ष्याने चोचीत बेडूक घेऊन वारणेच्या दिशेने उंच आकाशात झेप घेतली. 

हा पक्षी सध्या चावरे, वाठार, तळसंदे, पारगाव, बहिरेवाडी, वारणा, तसेच वडगाव येथील महालक्ष्मी तलाव व तळसंदे येथील विष्णू जलाशय परिसरात नारळाची उंच झाडे, मोबाइल टॉवर या ठिकाणी घरटी करुन राहत असलेचे निदर्शनास आले. याला इंग्रजीमध्ये "ब्लॅक आयबिस किंवा रेड नापड आयबिस असे म्हणतात. शराटी पक्षी खाद्य म्हणून बेडूक, कीटक, भुईमुग शेंगा व धान्य खातो. नर व मादी दिसायला सारखे असतात. ते मनुष्य वस्तीत जास्त करुन घरटी बांधतात, असे पक्षी अभ्यासक 
युवराज पाटील यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com