लग्न समारंभाला 50 लोकच बोलवा, नाहीतर फौजदारी...

invite 50 people to wedding, otherwise criminal
invite 50 people to wedding, otherwise criminal

कोल्हापूर : रुईकर कॉलनी येथील राजगौरव मंगल कार्यालय येथे विनापरवाना लग्न समारंभ आयोजीत केल्याबद्दल संबंधीत कार्यालय मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात विवाहासह कोणत्याही समारंभासाठी 50 लोकांची उपस्थिती असावी, आणि त्यासाठी परवानगी घेणे आवश्‍यक आहे. तसेच समारंभासाठी उपस्थित राहणाऱ्या सर्वांची नावे व फोन नंबरची यादी महापालिकेला देणे मंगल कार्यालयांना बंधनकारक आहे. 

महापालिका प्रशासनाने याची अमलबजावणीचे आदेश आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांना आज दिले आहेत. परवानगीनंतर समारंभाच्या दिवशी महापालिकेचे पथक जागेवर जाऊन व्हिडीओ शुटींग करेल. त्याठिकाणी 50 पेक्षा अधिक लोक उपस्थित असल्यास, नियामांचा भंग झाल्यास संबंधीत कार्यालय चालकावर व विवाह समारंभ आयोजित करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. 

शहरात कोरोना बाधीतांची संख्या वाढत आहे. साथ आटोक्‍यात आणण्यसाठी महापालिकेच्यावतीने युद्ध पातळीवर उपाययोजना सुरु आहेत. नियमांची कडक अमलंबजावणी करण्यात येत आहे. काही ठिकाणी समारंभांना 50 पेक्षा जास्त लोक उपस्थित राहत असलेचे निदर्शनास आले आहे. यातून संसर्ग झालेल्या घटना पुढे येत आहेत. यामुळेच मंगल कार्यालयांवर समारंभास उपस्थित राहणाऱ्या लोकांची नांवे व फोन नंबर्स घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

महापालिकेने आज रुईकर कॉलनी येथील राजगौरव मंगल कार्यालय येथे विनापरवाना लग्न समारंभ आयोजीत केल्याबद्दल संबंधीत कार्यालय मालकावर गुन्हा नोंद केला आहे. तरी शहरातील नागरीकांनी व मंगल कार्यालयांनी कोणताही समारंभ आयोजीत करताना प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. 

दृष्टिक्षेप 
- लग्न समारंभासाठी परवानगी आवश्‍यक 
- लग्नाला उपस्थित राहणाऱ्यांची नावे, फोन नंबर देणे बंधनकारक 
- महापालिका पथक करणार लग्न समारंभाचे व्हिडिओ शुटींग 
- पन्नासच्यावर लोक आल्यास होणार गुन्हा दाखल 

संपादन : प्रफुल्ल सुतार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com