"गोकुळ'ला आय.एस.ओ.22000:2018 मानांकन; राज्यातील पहिलांच संघ 

iso tank kolhapur district milk dairy gokul
iso tank kolhapur district milk dairy gokul

कोल्हापूर - उच्चतम गुणवत्ता त्याचबरोबर उत्पादकांसोबत ग्राहकांचे हित व आधुनिकतेची जोड या मध्ये नेहमीच अग्रेसर राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाला (गोकुळ) अन्न व सुरक्षा कार्यप्रणाली अंतर्गत आएसओ-22000ः2018 हे मानांकन प्राप्त झाले. अशा प्रकारचे मानांकन मिळणाणारा "गोकुळ' हा राज्यातील एकमेव संघ असून यामुळे संघाच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला गेला. 

यापूर्वी "गोकुळ' कडे शाखा व मुख्य दुग्धशाळेकडे सुरवातीस ISO 9002,ISO 9001:2008 WITH HACCP (अन्न व सुरक्षा कार्यप्रणाली) व त्यानंतर ISO 22000:2005 या कार्यप्रणालीनुसार कामकाज होत होते. याचीच पूढील सुधारीत कार्यप्रणाली म्हणून ISO 22000 : 2018 हे मानांकन प्राप्त करणेचा प्रयत्न गेल्या दोन वर्षांपासून संघामार्फत सुरू होता. याचाच भाग म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्टीफिकेशनचे काम करणारी जर्मनमधील एजन्सी टी.यु.व्ही. नॉंर्ड यांचे वरिष्ठ पातळीवरचे अधिका-यांनी 1 ते 6 मार्च 2021 या काळांत मुख्य दुग्धशाळेबरोबर विविध शाखांना भेटी देवून "गोकुळ' च्या कामकाजाची तपासणी केली. सदरच्या तपासणीमध्ये विशेषतः उत्पादीत होणारे गुणवत्तायुक्त दूध व दुग्धजन्य पदार्थाबरोबरच, अन्न सुरक्षा कार्यप्रणालीनुसार होणारे कामकाज आदि बाबींचा विचार करून हे मानांकन देण्याचे जाहीर केले आहे. 
 
उत्पादकांमुळेच मानांकन-आपटे 
"गोकुळ' चे अधिकारी व कर्मचारी यांचे सदरचे मानांकन प्राप्त करण्यासाठी मोलाचे सहकार्य लाभले आहे तसेच जिल्ह्यातील लाखो दूध उत्पादकांनी चांगल्याप्रकारचे दूध घातल्यामुळे हे मानांकन मिळवणे शक्‍य झाले आहे. यामुळे गोकुळच्या दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या उत्पादनांना मुंबई, पुणे ,गोवा सारख्या उच्चभ्रू ग्राहकांडून चांगल्या प्रकारे मागणी होईल. जिल्ह्यातील लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे परतावा देणे शक्‍य होणार असल्याचे "गोकुळ' चे चेअरमन रवींद्र आपटे यांनी सांगितले. 
 
 संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com