सावधान ; कागद, स्टेशनरी घेणे हीदेखील लाचच 

 It is also a bribe to get paper and stationery
It is also a bribe to get paper and stationery

कोल्हापूर-  शासकीय काम करून देण्यासाठी पैसे मागणे हा तर गुन्हा आहेच पण अनेक पोलिस ठाण्यात तक्रारदाराकडून कागद, कार्बन पेपर, पेनाच्या रिफील, झेरॉक्‍सचा खर्च याची मागणी केली जाते जर एखाद्याने त्यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली व एखादा पोलीस तक्रारदाराकडून पोलीस स्टेशनमधील कामकाजासाठी कागद, कार्बन किंवा इतर स्टेशनरी साहित्य स्वीकारताना सापडला तर तोदेखील पैसे घेणे इतकाच गंभीर गुन्हा आहे. 

काल कोल्हापुरात प्राथमिक आरोग्य केंद्रातील ज्या डॉक्‍टरला लाच घेताना पकडले आहे, त्याने त्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी लॅपटॉप लाचेच्या स्वरूपात मागितला होता. त्याही पुढे जाऊन कामासाठी आलेल्या व्यक्तीकडून काम करून देण्यासाठी चहापाण्याची, पार्टीची मागणी केली व तशी तक्रार दाखल झाली तरी तो पैसे स्वीकारण्यास इतकाच गंभीर गुन्हा नोंद होणार आहे. 

लाचलुचपत कायद्यानुसार शासकीय कामाच्या पूर्ततेसाठी कोणतीही अपेक्षा व्यक्त केली. तरी तो गुन्हा ठरतो. पण लोक किरकोळ स्वरूपाच्या तक्रारी करण्यास पुढे येत नव्हते. आता मात्र लोक जागरुक झाले आहेत. नागपूर येथील एका मुख्याध्यापकाने शाळा सोडल्याचा दाखला देण्यासाठी एका विद्यार्थ्याच्या पालकाकडे काही डझन वह्या मागितल्या नंतर त्या पालकांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली. त्या मुख्याध्यापकावर कारवाई झाली आहे, तसेच मुंबई सांताक्रूझ पोलीस ठाण्यात एका पोलिसाने एका अपघाताच्या एफआयआरची छायांकित प्रत देण्यासाठी काही कागदपत्राच्या प्रतीचे झेरॉक्‍स काढून आणून देण्याची मागणी केली होती. त्या संदर्भात तक्रार झाल्यावर त्या पोलिसावर गुन्हा दाखल झाला आहे. 

काल कोल्हापुरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेली कारवाई याच स्वरूपाची आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी लॅपटॉप हवा म्हणून संबंधित डॉक्‍टरने कर्मचाऱ्याकडून लॅपटॉप साठी पैसे मागितले होते. तक्रार दाखल झाल्यावर त्याच्यावर काल गुन्हा दाखल झाला आहे .लातूरमध्ये एका कर्मचाऱ्याच्या कामाच्या मूल्यांकन अहवालावर सही करण्यासाठी एका वैद्यकीय अधिकाऱ्याने व्हिस्स्कीची ची बाटली व तीन तीन टिन बियरची मागणी केली होती तोही गुन्हा नोंद झाला आहे. कल्याणमधील एका अधिकाऱ्याने तर घरफळा जप्ती वॉरंट मागे घेण्यासाठी त्या घरातील महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली होती. संबंधित महिलेने तो फोन कॉल रेकॉर्ड करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे. 

या पार्श्वभूमीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कारवाईसाठी अधिक सक्रिय झाला आहे. लोकही जागरुक झाले आहेत. जे काम कायदेशीर आहे ते करून घेण्यासाठी कोणाला चहाचा कप देण्याचीही गरज नसते याची लोकांना आता जाणीव झाली आहे. याशिवाय मोबाईल वरून होणारे संभाषण रेकॉर्ड करून घेण्याची सोय आहे. हे संभाषण लाचलुचपत प्रतिबंधक कारवाई खाली गुन्हा दाखल करण्यासाठी सज्जड पुरावा म्हणून उपयोगी ठरत आहे. त्यामुळे यापुढे लोक अधिक जागरूक झाले तरच लाचलुचपत ची कार्यवाही अधिक प्रभावी होणार आहे. 


तक्रारीसाठी येथे साधा संपर्क 
शासकीय काम करून देण्यासाठी पैशाचीच मागणी नव्हे तर अन्य कोणत्याही स्वरुपात मागणी केली तर नागरिकांनी तक्रार दाखल करण्यासाठी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे नंबर. आदिनाथ बुधवंत. डीवायएसपी -अँटी करप्शन टोल फ्री क्रमांक 1064 व्हाट्‌सऍप क्रमांक 7875333333 कार्यालय क्रमांक 02312540989 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com