..पण डॉक्‍टर, नर्स, वॉर्डबाय कोठून आणणार?  डॉक्‍टरसुद्धा माणूसच आहे!

It will not only increase the facilities
It will not only increase the facilities

कोल्हापूर - जिल्ह्यात ऑक्‍सिजनचा पुरवठा मुबलक होऊ शकतो, बेडची संख्या वाढू शकते, जंम्बो कोविड सेंटर होईल, पण डॉक्‍टर, नर्स आणि वॉर्डबाय कोठून आणणार? त्यांची मर्यादा ही ओळखली पाहिजे. केवळ सुविधा वाढवून चालणार नाही, डॉक्‍टरसुद्धा माणूस आहे, त्यांना सुद्धा विश्रांती लागते, याचाही विचार कोविड 19च्या महामारीत होणे अपेक्षीत आहे. जिल्ह्यात डॉक्‍टर, नर्स आणि इतर स्टाफची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे घरी रहा, सुरक्षित रहा. मास्क वापराच. सोशल डिस्टन्स्‌ ठेवा. यासह इतर नियम काटेकोरपणे पाळणे आणि स्वतःला कोणताही आजार होऊ न देण्यासाठी आवश्‍यक ती काळजी घेणे हेच आता महत्वाची ठरणार आहे. 

जिल्ह्याची लोकसंख्या तब्बल 42 लाखांपर्यंत आहे. देशांतील हॉस्टस्पॉटच्या यादीत कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश आहे. यावरून कोल्हापूरची स्थिती किती भयानक आहे हे स्पष्ट होते. रुग्णांना बेड मिळत नाही, ऑक्‍सिजन मिळत नाही अशा अनेक तक्रारींचा पाढा वाचला जात आहे. प्रत्यक्षात कोल्हापुरातील वैद्यकीय सेवेच्या मर्यादा यातून स्पष्ट झाल्या आहेत. प्रत्यक्षात इतर जिल्ह्यात राज्यात जाणारा ऑक्‍सिजन बंद केला तर कोल्हापूरला तो मिळेल, व्हेन्टीलेटर उपलब्ध करता येतील. इतर भौतिक सुविधा निर्माण करता येतील. पण डॉक्‍टर,नर्स आणि वॉर्डबाय कोठून आणणार ? याचेही गांभीर्य लक्षात घेतले पाहिजे. 

जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत केवळ पाच-साडेपाच हजार डॉक्‍टर आहेत. त्यामध्येही कोरोनावर उपचार करणाऱ्यांची संख्या मर्यादीत आहेत. ऑर्थोपेडिक, स्त्रीरोग तज्ज्ञ, नेत्ररोग तज्ज्ञांकडून कोरोनावरील उपचार केले जात नाही. त्यामुळे ग्राऊंड रिपोर्टवरील माहिती घेतली असताना मोजक्‍यांच डॉक्‍टरांकडून कोरोनाच्या रुग्णांवर उपचार केले जात आहेत. त्यांच्याही मर्यादा स्पष्ट आहेत. तेही माणूस आहेत. त्यांना सलग काम करणाऱ्यांवर मर्यादा आहेत. अनेक डॉक्‍टर सुद्धा कोरोना पॉझिटीव्ह होऊन बरे झाले आहेत. 
 
उपचार करणारे मोजकेच 
कोविड-19 रुग्णावर उपचारासाठी व्हेन्टीलेटर लावण्यासाठी आणि थेट उपचार करण्यासाठी एमडी फिजिशियन आणि भूल देणारेच डॉक्‍टर लागतात. प्रत्यक्षात त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे एमबीबीएस, बीएचएमएस, बीएएमस डॉक्‍टर इतर उपचार करतात. त्यामुळे डॉक्‍टरांची संख्या पाहता, थेट उपचार करणाऱ्यांची संख्या मोजकीच आहे. 
 
एमबीबीएस, होमिओपॅथिक, एमडी या सह इतर डीग्री घेतलेल्या जिल्ह्यातील डॉक्‍टरांची संख्या सुमारे साडेचार ते पाच हजार आहे. यामध्ये डोळ्याचे, स्त्रीरोग तज्ज्ञ असे डॉक्‍टर या कोविडच्या महामारीत इतर उपचार करीत नाहीत. त्यामुळे सध्या वाढत असलेल्या रुग्णांवर उपचार करणाऱ्यां डॉक्‍टरांची संख्या नगन्य आहे असे म्हणावे लागेल. 
-डॉ.ए.एम.शिर्के, अध्यक्ष कोल्हापूर मेडिकल असो. 
 
मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पीटल मध्ये नर्स आणि वॉर्डबॉय मिळत नसल्याची स्थिती आहे. काहींना दुप्पट,तिप्पट पगार दिला जात आहे. मुळात मोठ्या हॉस्पीटल मध्ये केरळ आणि इतर राज्यातील मधील नर्स आहेत. धोकादायक स्थिती असल्यामुळे स्थानिक पातळीवरील वॉर्डबायला कुटुंबीयांकडून नोकरीवर सोडले जात नाही. काही हॉस्पीटलमध्ये कोरोना होऊन बरा झालेल्यानंतरही नर्सस्‌, वॉर्ड बॉय पुन्हा प्रचंड ताण-तणावात काम करीत आहेत. 

स्त्रीरोग तज्ज्ञांकडून नियमित बाळंतपणे, सिजर केले जाते. तेथे उपचार सुरूच आहेत. मात्र तेथील डॉक्‍टर किंवा इतर स्टाफ कोविड-19साठी घेतला जाऊ शकत नाही. या शस्त्रक्रीया किंवा बाळंतपणे लांबविणे शक्‍य होत नाही. त्यामुळे अशा अत्यावश्‍यक उपचारासाठीही डॉक्‍टर, नर्स, वॉर्डबॉय यांची विभागणी होते. त्यामुळे कोविड-19 मध्ये उपचार करणाऱ्यांचीही मर्यादा आता स्पष्ट झाली आहे. 

संपादन - धनाजी सुर्वे 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com