जयसिंगपूर होतेय अनलॉक; व्यावसायिक ठेवणार ग्राहकांच्या नोंदी

Jaisingpur Unlock; Professional will keep customer records
Jaisingpur Unlock; Professional will keep customer records

जयसिंगपूर : शहर उद्यापासून (शुक्रवार) अनलॉक होत असताना व्यावसायिकांवर मात्र ग्राहकांच्या नोंदी ठेवण्याचे अतिरिक्त काम करावे लागणार आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने व्यावसायिकांना ग्राहकांच्या नोंदी ठेवण्याचे आदेश दिल्याने नोंदी ठेवण्याची जबाबदारी व्यावसायिकांवर आली आहे. जयसिंगपूर आठ दिवसांपासून लॉकडाउन असल्यामुळे पुरेशी खबरदारी घेऊनच दुकाने उघडली जाणार आहेत. 

शहरात सध्या तीन कंटेन्मेंट झोन असून यामुळे पालिका प्रशासनाने एकमताने शहर लॉकडाउन केले होते. लॉकडाउनमुळे शहरातील व्यावसायिकांमधून नाराजी व्यक्त केली जात होती. दोन दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते आणि व्यावसायिकांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना जाब विचारुन दरवेळी रुग्ण सापडले तर शहर बंद करणार का? असा प्रश्‍न विचारला होता. आम्हीही खबरदारी आणि उपाययोजना राबवून व्यावसाय सुरु करु पण शहर अनलॉक करा, अशी मागणीही करण्यात आली होती. 

प्रशासनावरील दबाव लक्षात घेता तातडीने शहर अनलॉक करण्याचा निर्णय झाला. मात्र, सकाळी नऊ ते रात्री सात या वेळेत दुकानांमधील ग्राहकांचे नाव, गाव आणि संपर्क क्रमांकाच्या नोंदी ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. व्यावसायिकांनी सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर आणि मास्कचा वापर करुन खबरदारीने व्यवसाय सुरु करण्यास परवानगी मिळाली असली तरी ग्राहकाच्या नोंदीचा अतिरिक्त ताण त्यांच्यावर पडणार आहे. 

शहरात सराफच्या दुकानांपासून रस्त्यावर फुले विक्री करणाऱ्यांसह लहान मोठ्या व्यावसायिकांची संख्या अधिक आहे. मात्र, आणखी काही दिवस तरी कोरोनाचे संकट परतवून टाकण्यासाठी अतिरिक्त काम सोसावे लागणार आहे. दूध विक्री, बेकरी व्यावसायिक, किराणा आदी ठिकाणी नियमांचे तंतोतंत पालन करावे लागणार आहे. 

भाजीपाला विक्रेत्यांनी नियम कसा पाळावा ? 
शहरात लॉकडाउनमध्ये शहरासह परिसरातील ग्रामीण भागातून अनेक शेतकरी भाजीपाला विक्रीसाठी घरोघरी फिरत आहेत. भाजीपाला विक्रेत्यांची संख्या दुपटीने वाढली आहे. ग्राहकांच्या नोंदी ठेवण्याचा आदेश पालिका प्रशासनाने दिला असला तरी भाजीपाला विक्रेत्यांनी नियम कसा पाळावा याबाबत प्रशासनाने स्पष्ट आदेश दिले नसल्याने भाजीपाला विक्रेत्यांमध्ये संभ्रम आहे. 

दृष्टिक्षेप 
- जयसिंगपूर आठ दिवसांपासून होते लॉक 
- सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत दुकाने सुरू राहणार 
- खबरदारी, उपाययोजना करूनच व्यवसाय सुरू होणार 
- ग्राहकांच्या नोंदी ठेवण्याची अतिरिक्त जबाबदारी व्यावसायिकांवर 

(संपादन : प्रफुल्ल सुतार) 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com