ब्रेकिंग - दख्खनच्या राजाची श्रावण षष्ठीची यात्राही रद्द 

jotiba yatra cancelled due to corona effect
jotiba yatra cancelled due to corona effect

जोतिबा डोंगर - श्री क्षेत्र जोतिबा डोंगर तथा वाडी रत्नागिरी (ता. पन्हाळा ) येथील आदिमाया श्री चोपडाई देवीची  २५ जुलै रोजी होणारी श्रावण षष्ठी यात्राही कोरोनाच्या संसर्गामुळे रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या बाबत श्रावण षष्ठी यात्रे संदर्भात डोंगरावर  बैठक झाली त्यात हा निर्णय घेण्यात आला. 

यात्राकाळात तीन दिवस जोतिबा डोंगरासह परिसरातील पोहाळे तर्फ आळते, कुशीरे तर्फ ठाणे, गिरोली, दानेवाडी (ता. पन्हाळा ) ही गावे पूर्णपणे लॉकडाऊन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
 यात्रेदिवशी मंदिरातील सर्व धार्मिक विधी पारंपरिक पद्धती नुसार होतील. कोणत्याही भाविकाला मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. 

चैत्र यात्रे प्रमाणे भाविकांनी सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे. जोतिबा डोंगरावर दरवर्षी श्रावण महिन्यात चोपडाई देवीची श्रावण षष्ठी यात्रा भरते. पुणे मुंबई या भागातील सर्वाधिक भाविक या यात्रेसाठी येतात. यंदा कोरोनामुळे ही यात्रा भरणार की नाही याकडे भाविकांच्या नजरा होत्या. पण जिल्हात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे प्रशासनाने षष्ठी यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला.

डोंगरावर यात्रे दिवशी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. जोतिबा डोंगरावर झालेल्या बैठकीला पन्हाळ्याचे प्रांताधिकारी अमित माळी तहसीलदार रमेश शेंडगे सरपंच राधा बुणे, देवस्थान समितीचे अधीक्षक महादेव दिंडे, दहा गावकर , पूजारी ग्रामस्थ उपस्थित होते. 

दरम्यान , श्रावणषष्ठी यात्रा रद्द झाल्याने व्यापारी दुकानदार ग्रामस्थ पूजारी यांना मोठा फटका बसणार आहे. १५ मार्च पासून आज पर्यंत पूर्ण डोंगरावर शांतता आहे. मंदिरही बंदच आहे .

संपादन - धनाजी सुर्वे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com