शिखरे रंगणार का देवा जोतिबा...? भक्तांचा असा हा सवाल.... 

jotiba yatra postponed because on coronavirus
jotiba yatra postponed because on coronavirus

जोतिबा डोंगर (कोल्हापूर ) - येथील श्री दख्खनचा राजा जोतिबा देवालयाची शिखरांची रंगरंगोटी यंदा होणार का ? असा प्रश्न जोतिबा भाविकांना पडला आहे. प्रत्येक जण म्हणू लागला आहे की, शिखरे रंगणार का देवा..? 

दरवर्षी चैत्र यात्रेपूर्वी या शिखरांची रंगरंगोटी जाते. कारण मंदिर शिखरे दरवर्षी पावसाळी हवामानामुळे दाट धुके जोरदार पाऊस यामुळे  शिखरांवर सर्रास शेवाळ साठते, छोट्या वनस्पतीही उगवून येतात. त्यामुळे दरवर्षी ही सर्व शिखरे स्वच्छ करून त्यावर रंगरंगोटी करण्याची पारंपरिक पद्धत डोंगराव आहे.

महादेव (बद्रीकेदार) चोपडाईदेवी व श्री जोतिबा देव अशा ह्या तीन मंदिरांचा समूह असून या तिन्ही मंदिराची शिखरे उंच असून शिखरावर चढ-उतार करण्याचे काम अवघड आहे. वरती चढताना दोर लावूनच या शिखरांवर चढावे लागते. मोठया दोराच्या साह्यानेच ही शिखरे रंगवावी लागतात. गेल्या पंचवीस वर्षापासून ही शिखरे रंगरंगोटी करण्याचे काम कसबा बावडा रमण मळा येथील अनिल अधिक करतात. आठ दहा दिवसात ही सर्व शिखरे रंगवून पूर्ण होतात. पूर्ण काळजीपूर्वक हे काम करावे लागते. उन्हांमुळे मंदिरावरील दगड तपतो परिणामी पायाला चटके बसतात. त्यामुळे रंगरंगोटी ही सकाळी लवकर व दुपारनंतर करावी लागते. वंशपरंपरेनुसार शिखरावर ध्वज (पताका) लावण्याचे काम छत्रे भावकीकडे आहे. या भावकीतील सर्व लोकांना मंदिरा शिखरावर ध्वज लावण्याची कला अवगत आहे. भाविकांनी देईल त्या दक्षिणेवर ते समाधान मानतात. दरम्यान,
 गुढीपाडवा झाला तरी यंदा या शिखरांच्या रंगरंगोटीचे काम अद्याप सुरू नाही. ही शिखरे  दरवर्षी स्वच्छ केल्यामुळे त्यास ऑइल पेंट कलर केल्यामुळे त्यास वर्षभर काही होत नाही. फक्त पावसामुळे रंग जातो. 

रंगरंगोटी केलेली शिखरे ही आकर्षक दिसतात. त्यामुळे मंदिराला शोभा येते.  यंदा कोरोना विषाणूंचा संसर्ग  टाळण्यासाठी गेल्या पंधरा दिवसापासून डोंगरावर शांतता आहे. मंदिराचे दरवाजेही बंद असून केवळ पुजारी वर्गाला प्रवेश दिला जातो.७ एप्रिलला जोतिबा यात्रेचा मुख्य दिवस आहे. यंदा यात्रेवर प्रशासनाने बंदी घातत्याने डोंगर गुलालमय होणार नाही हे मात्र निश्चित. निदान मंदिराच्या सुरक्षतेसाठी शिखरांची रंगरंगोटी तरी अावश्यक आहे.   

दरवर्षीप्रमाणे जोतिबा मंदिरांची शिखरांची रंगरंगोटी करण्यात येणार असून देवस्थान समितीच्या कोल्हापुर कार्यालयातून आदेश आल्यावर हे काम सुरू करण्यात येणार आहे.  

महादेव दिंडे. अधिक्षक - पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती जोतिबा कार्यालय 

जोतिबा शिखरांची रंगरंगोटी दर वर्षी करणे गरजेचे कारण जोतिबा येथील हवामान त्यास कारणीभूत आहे . पावसाळयात तर पूर्ण शिखरे शेवाळमय होतात .

संजय पाटणकर - कोल्हापूर भाविक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com