कागलच्या तरुणाला मिळणार 82 लाखांची शिष्यवृत्ती

Kagal's Youth To Get Rs 82 Lakh Scholarship Kolhapur Marathi News
Kagal's Youth To Get Rs 82 Lakh Scholarship Kolhapur Marathi News
Updated on

इचलकरंजी : येथील "डीकेटीई'मधून फॅशन टेक्‍नॉलॉजी पदवी प्राप्त विद्यार्थी शिवतेज गस्ती याची "मास्टर इन इंटरनॅशनल बिझनेस' या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ऑस्ट्रेलियातील "युनिव्हर्सिटी ऑफ न्यू साऊथ वेल्स सिडनी' या विद्यापीठात निवड झाली आहे. भारत सरकारच्या "नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशिप' योजनेतून त्याला 82 लाखांची शिष्यवृत्ती मिळेल. 

देशभरातून केवळ सहा विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. यातील शिवतेज हा मूळचा कागलचा आहे. त्याचे विविध नॅशनल व इंटरनॅशनल जर्नल्समध्ये रिसर्च पेपर प्रसिद्ध झाले आहेत. परदेशात उच्चशिक्षण करण्यासाठी आवश्‍यक जी.आर.ई. व आय.ई.एल.टी.एस. या स्पर्धांमध्ये उत्तम क्रमांकाने तो उत्तीर्ण झाला आहे. 


याबाबत शिवतेज म्हणाला, की "डीकेटीई'मधील अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अशा लॅबोरेटरी, लायब्ररी याचा त्याला चांगला फायदा झाला. येथील अनुभवी प्राध्यापक वृंद व विशेष करून इंडस्ट्रीयल प्रशिक्षण घेत असताना मिळालेला अनुभव यामुळे मी हे यश प्राप्त करू शकलो. 

त्याला संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष व आमदार प्रकाश आवाडे, ट्रेझरर आर. व्ही. केतकर, सचिव डॉ. सपना आवाडे यांनी शुभेच्छा दिल्या. संचालक प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले, उपसंचालक प्रा. डॉ. यू. जे. पाटील, फॅशन टेक्‍नॉलॉजी इन्चार्ज प्रा. एल. जी. पाटील तसेच महालक्ष्मी ऍकॅडमीचे अभय केळकर यांचे मार्गदर्शन लाभले. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com