खुशखबर... बारावीचा निकाल 'या' तारखेला जाहीर होणार...

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 12 July 2020

मार्च महिन्यात झालेल्या बारावी परीक्षेची सांगता 18 जुन रोजी झालेल्या शेवटच्या इंग्रजी विषयाच्या पेपरने झाली होती.

बेळगाव - गेल्या अनेक दिवसांपासून निकालाची प्रतीक्षा लागून राहिलेल्या विद्यार्थ्यांना लवकरच दिलासा मिळणार आहे. कारण कर्नाटक राज्यातील पदवीपूर्व शिक्षण खात्याने बारावीचा निकाल 18 जुलै  रोजी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.

राज्याचे शिक्षण मंत्री सुरेश कुमार यांनी निकाल व शाळा कधीपासुन सुरू होणार याबाबत अधिक माहिती देताना सध्या शाळा कोणत्या प्रकारे सुरू करता येतील याबाबत विचार केला जात आहे. मात्र कोरोनाचे संकट मोठे असल्याने शाळा सुरू करताना सर्व गोष्टींचा विचार केला जाणार आहे. सध्या सोमवारपासून दहावीच्या मूल्यमापनाला सुरवात होणार आहे. याकडे लक्ष देण्यात आले असून 18 जुलै रोजी बारावीचा ऑनलाइन निकाल जाहीर केला जाईल अशी माहिती दिली आहे.

वाचा - गोवा - बेळगावमधील संबंधात 'हा' ठरतोय अडथळा ; तोडगा काय निघेना...

मार्च महिन्यात झालेल्या बारावी परीक्षेची सांगता 18 जुन रोजी झालेल्या शेवटच्या इंग्रजी विषयाच्या पेपरने झाली होती. त्यानंतर पेपर तपासणीचे काम पूर्ण करून निकाल जाहीर करण्याची तयारी शिक्षण खात्याने केली आहे. त्यानुसार 18 रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर ऑनलाइन प्रवेश प्रकिया राबविण्याबाबत शिक्षण खाते विचार करीत आहे.

 

संपादन - मतीन शेख


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Karnataka State Undergraduate Education Department announces Class hsc results date