कोल्हापूर : "केशवराव'मध्ये "हाउसफुल्ल'चा फलक..! 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 23 January 2021

नाट्यप्रयोगांच्या निमित्ताने "हाउसफुल्ल'चा फलक नाट्यगृहावर झळकला आहे

कोल्हापूर - संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात आजपासून "मेलडीज ऋषी' या मैफलीने व्यावसायिक कार्यक्रमांना प्रारंभ झाला. यानिमित्त दहा महिन्यांनी "वन्स मोअर' आणि शिट्यांचा आवाज नाट्यगृहात घुमला. उद्या (ता. 24) होणाऱ्या नाट्यप्रयोगांच्या निमित्ताने "हाउसफुल्ल'चा फलक नाट्यगृहावर झळकला आहे. 

"मेलडीज ऋषी' या कार्यक्रमात दिनेश माळी, सूरज नाईक, मुकुंद वेल्हाळ, शीतल ताटे, अपूर्वा नानिवडेकर, ऋचा गवांदे यांचा स्वरसाज होता; तर दहा वादकांची संगीत साथ होती. निशा साळोखे यांचे निवेदन होते. उद्या सकाळी प्रसिद्ध अभिनेते भरत जाधव यांच्या "सही रे सही' नाटकाचा प्रयोग होणार असून, दुपारी चारला ज्येष्ठ नाट्यवितरक प्रफुल्ल महाजन यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिनेता संदीप पाठक यांचा "वऱ्हाड निघालंय लंडनला' हा एकपात्री प्रयोग होणार आहे. 

हे पण वाचाकोल्हापूर : शेतमजूर महिलेचा खून ; मानेवर धारदार शस्त्राचे वार

 

दरम्यान, कार्यक्रमांचे सादरीकरण करताना कोरोना प्रतिबंधात्मक आवश्‍यक ती सर्व खबरदारी घेण्यात आली आहे. नाट्यगृह व्यवस्थापनातर्फे रोज रात्री नाट्यगृहाचे सॅनिटायझेशन होते. त्याशिवाय प्रयोगासाठी आत जाताना प्रत्येकाचे हॅंड सॅनिटायझेशन, संयोजकांतर्फे थर्मल स्कॅनिंग केले जाते. आसन व्यवस्था 50 टक्के असल्याने एकाआड एक अशी व्यवस्था करण्यात आली आहे. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: keshavrao bhosale natyagruha kolhapur