
कोरोनामुळे तिरुपती देवस्थान बंद असल्याने भाविकांना वर्षभरापासून दर्शनापासून वंचित राहावे लागले होते.
उजळाईवाडी (कोल्हापूर) : कोल्हापूर ते अहमदाबाद या विमानसेवेची प्रतीक्षा आता संपणार असून उद्यापासून (ता. २२) सोमवार, बुधवार व शुक्रवार असे तीन दिवस विमान सुरू होत आहे. कोरोनामुळे खंडित असलेली तिरुपती मार्गावरील विमानसेवाही उद्यापासून सुरू होत आहे.
अनेक व्यापारी, व्यावसायिक, उद्योगासंबंधित व्यावसायिकांना कोल्हापूरहून अहमदाबाद, राजकोट, सुरत शहरांना जाण्यासाठी या सेवेचा फायदा होणार आहे. कोरोनामुळे तिरुपती देवस्थान बंद असल्याने भाविकांना वर्षभरापासून दर्शनापासून वंचित राहावे लागले होते.
हेही वाचा- ग्रामपंचायतीचा कर भरा अन् सोने जिंका
आठवड्यातून तीन दिवस सेवा
आता आठवडाभर विमानसेवा सुरू राहणार आहे. या दोन्ही मार्गांवर इंडिगो एअरलाईन्सची विमानसेवा आहे. कोल्हापूर-अहमदाबाद विमानफेरीसाठी ३५ प्रवासी जाणार असून प्रत्येकी ३,६०० रुपये तिकीट दर आहे. कोल्हापूर विमानतळावरून मुंबई, अहमदाबाद, हैदराबाद, तिरुपती व बंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळांवर विमानांचे संचालन होणार आहे.
संपादन- अर्चना बनगे