कोविशिल्ड लसीकरणानंतर पाच तासांची शस्त्रक्रिया यशस्वी 

शिवाजी यादव  
Tuesday, 19 January 2021

50 वर्षी व्यक्तीवर व्हॉल्व बदलण्याची शस्त्रक्रिया सलग पाच तासाची शस्त्रक्रिया यशस्वी केली

कोल्हापूर - सीपीआर रूग्णालयात आज झालेल्या कोविशिल्ड लसीकरणानंतर अवघ्या अर्ध्याच तासात डॉ. अब्दुल माजिद यांनी व्हॉल्व बदलण्याची पाच तासांची शस्त्रक्रिया यशस्वी केली. हृदय शस्त्रक्रिया विभागात ही शस्त्रक्रिया झाली. यातून अन्य डॉक्‍टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना लसीकरणकरून घेण्यासाठी प्रोत्साहन लाभत आहे. 

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी कोविशिल्ड लसीकरण आले. त्याबाबतची शास्त्रीय माहिती आरोग्य विभागाच्या डॉक्‍टर लाभार्थींना दिली आहे. तरीही अनेक डॉक्‍टर किंवा वैद्यकीय कर्मचारी लस नंतर घेऊन असे सांगत लसीकरण टाळत आहेत. या उलट सीपीआरमध्ये पहिल्या दिवशी डॉ. अक्षय बाफना यांनी पहिली लस टोचून घेतली. त्या पाठोपाठ हृदयशस्त्रक्रिया यशस्वी केली. यानंतर आज लसीकरणाच्या दुसऱ्या दिवशी हृदय शस्त्रक्रिया विभागाचे डॉ. अब्दुल माजीद यांनी लस टोचून घेतल्यानंतर अर्धा तास विश्रांती घेतली. त्यानंतर 50 वर्षी व्यक्तीवर व्हॉल्व बदलण्याची शस्त्रक्रिया सलग पाच तासाची शस्त्रक्रिया यशस्वी केली. मात्र डॉ. अब्दुल यांना कोणताही त्रास झालेला नाही. आपली प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती त्यांनी सहकारी डॉक्‍टरांना देत लसीकरण सुरक्षित असल्याचा निर्वाळा दिला आहे. 

हे पण वाचा कोविशिल्ड लस घेतली अन् हृदय शस्त्रक्रिया यशस्वी केली

 

या शस्त्रक्रिया वेळी डॉ. अब्दुल यांना डॉ. विदूर कर्णिक, डॉ. भूपेंद्र पाटील, भूलतज्ञ हेमलता देसाई यांचे सहकार्य लाभले. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur cpr covid vaccine dr abdul majid