कोल्हापूरचा राज्यात डंका ; "सीसीटीएनएस'मध्ये अव्वल 

 राजेश मोरे 
Wednesday, 27 January 2021

चंद्रपूरने 222 तर सातारा जिल्ह्याने 221 गुण मिळून अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला. 

कोल्हापूर - जिल्हा पोलिस दल सीसीटीएनएस या संगणकीय प्रणालीमध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. जिल्ह्याने 239 गुणापैकी 227 गुण मिळवून हे यश संपादन केले. चंद्रपूरने 222 तर सातारा जिल्ह्याने 221 गुण मिळून अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला. 

गुन्ह्यांची माहिती भरणे, गुन्ह्यांचा आढावा घेणे, सिटीजन पोर्टल वर प्राप्त होणाऱ्या तक्रारी त्यांचे निरसन करणे, त्यांची निर्मिती करणे, तसेच गुन्हे प्रकटीकरण व प्रतिबंधात्मक कारवाई यांच्या माहिती संकलित करून ती पोलिस दलाकडून सीसीटीएनएस या संगणकीय प्रणालीत भरण्यात येते. भविष्यात ही माहिती सहज उपलब्ध होते. अपर पोलिस अधीक्षक तिरूपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलिस दलाने या प्रणालीत 2020 मध्ये राज्यात सर्वोत्कृष्ठ कामगिरी केली. अपर पोलिस महासंचालक, अतुलचंद्र कुलकर्णी गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या हस्ते विभागाला गौरविण्यात आले. उल्लेखनीय कामगिरीबद्दल या विभागात काम करणारे अधिकारी कर्मचाऱ्यांसह अपर पोलिस अधीक्षक काकडे यांचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी अभिनंदन केले. 

हे पण वाचा - बाप रे! पहिला विवाह झाला असतानाही संपत्तीसाठी बनली चक्क मृत व्यक्तीची पत्नी

 

                      
संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur district first In CCTNS