कोल्हापूरमध्ये ईद साधेपणाने साजरी : भारतातून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी आणि कोविड योद्ध्याच्या रक्षणासाठी कोली प्रार्थना....

संभाजी गंडमाळे 
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

मुस्लिम बोर्डिंगच्या पटांगणावर पाच मुस्लिम बांधवांचे बकरी ईदची नमाज पठण 

कोल्हापूर  :  आज मुस्लिम मुस्लिम बॉर्डीगच्या  पटांगणावर फक्त ५ मुस्लिम बांधवांनी शासनाने दिलेले आदेश पालन करत
नमाज पठण केले. मौलाना मूबिन बागवान यांनी  ईदची नमाज आणि खुतबा पठण केले.

या नमाज नंतर अल्लाह कडे संपूर्ण जगातून आणि भारतातून कोरोनाला हद्दपार कर आणि समस्त मानव जातीला या भयानक आजारापासून मुक्त कर तसेच या देशाची प्रगती कर,आपसात भाईचारा वाढव,कोरोना सोबतच्या युद्धात जे पोलिस कर्मचारी,महानगर पालिकेचे कर्मचारी, सरकारी आधिकरी यांनी जे कार्य केले आहे व करत आहेत त्यांना  उत्कृष्ट आरोग्य लाभो,भारताची आणि इथल्या नागरिकांचे सुख समाधान व आर्थिक उन्नती होवो अशी परम अल्लाहकडे दुवा करण्यात आली.

हेही वाचा- ‘सकाळ’चा आज चाळिसावा वर्धापन दिन : हा स्नेहबंध अतुट राहो... -

यावेळी मुस्लिम बोर्डिंग चेअरमन गणी आजरेकर यांनी ईदच्या शुभेच्छा देत असे सांगितले की, छत्रपत्ती शाहू महाराजानी निर्माण केलेल्या ईदगाह मैदानावर हजारो लोक नमाज पठाण करत होते पण आज सरकारी आदेशाने आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या विनंतीनुसार केवळ  ५ लोकांनी ईदची नमाज पठण केली आणि साध्यापणाने  ईद साजरी झाली.

हेही वाचा- ई' पासशिवाय आले जिल्ह्यात 14 हजारांवर लोक -

 बकरी ईदची दावत न करता गोरगरीब लोकांना मदत करा,मास्कचा वापर करून सामाजिक अंतर  ठेवून  आपले नित्य काम करत रहा,आपल्या घरी राहा सुरक्षित राहा असे सांगावेसे वाटते असे ते म्हणाले,  या वेळी मुस्लिम बोर्डिंग चे प्रशासक कादरभाई मलबारी यांनी आभार मानले.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur Eid festival prayers of five Muslim brothers on the ground of Muslim Boarding