''वीज जोडणी तोडल्यास आमच्याशी गाठ'' 

शिवाजी यादव 
Wednesday, 20 January 2021

उर्जामंत्री लबाड, उर्जामंत्र्यांच्या वक्तव्याच्या निषेध करतो

कोल्हापूर  - "" कोरोनाकाळातील वीज बिलांची थकबाकी माफ करावी अशी मागणी प्रलंबीत असताना उर्जामंत्री थकबाकीदारांची वीज जोडणी तोडण्याचे आदेश देत आहे. उर्जा मंत्र्यांचे विधान बेताल आहेत. त्या आधारावर कोणी घरगुती वीज ग्राहकांची वीज तोडल्यास आमच्याशी गाठ आहे.'' असा इशारा आम्ही विज बिल भरणार नाही कृती समितीचे निमंत्रण निवास साळोखे यांनी समिती तर्फे पत्रकार परिषदेत दिला. 

येथील विठ्ठल मंदिरात झालेल्या बैठकीत ते बोलत होते श्री. साळोखे म्हणाले की, "" उर्जामंत्री लबाड, उर्जामंत्र्यांच्या वक्तव्याच्या निषेध करतो. उर्जामंत्र्या आम्ही कोरोनाकाळातील वीज बिलात सवलत देऊ असे सुरवातीला म्हटले होते. त्यानंतर वीज ग्राहकांना दिवाळीपूर्वी गोड बातमी देऊ म्हटले होते. मात्र कोणतीही गोड बातमी दिलेली नाही, यापुढे जात त्यांनी गेल्या दोन दिवसापूर्वी आपली भूमिका बदलून थेट थकबाकीदारांची वीज जोडण्या तोडण्याचे आदेश दिले. त्यामुळे वीज तोडायला येणाऱ्यांचे काय करायचे ते आम्ही बघतो.'' 

कॉमन मॅन संघटनेचे ऍड. बाबा इंदूलकर म्हणाले की, "" शासकीय कार्यालयाच्या विज बिलांची थकबाकी 50 लाखांच्या पुढे आहे. त्याची विज बिलाची वसुली झालेली नाही आणि सर्वसामान्य जनतेचे कोरोनाकाळात रोजगार गेले अर्थिक संकट आहे अशाची जेमतेम रक्कम थकीत असताना वीज जोडणी तोडण्याचे आदेश देत असलातर जनतेला वाली कोण असा प्रश्‍न आहे.'' 

सुभाष जाधव म्हणाले की, "" वीज बिल माफीची मागणी प्रलंबीत असताना कोणी वीज जोडणी तोडायला आले तर त्याला कार्यकर्ते रोखतील.'' 

बाबा पार्टे म्हणाले की, "" उर्जामंत्र्याच्या अखत्यातरीतील वीज कंपनीतील अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. या भ्रष्टाचार पहिल्यांदा थांबवावा त्यानंतरच वीज जोडण्या तोडण्याची भाषा उर्जामंत्र्यांनी करावी.'' 

यावेळी समितीचे अनिल यादव, जयकुमार शिंदे, अशोक भंडारे, किसन कल्यानकर, अनिल घाटगे, सुजीत चव्हाण, दत्तात्रय जांभळे, विजयसिंह पाटील, विवेक कारंडे, महादेव पाटील आदीनी मनोगत व्यक्‍त केले. 

हे पण वाचा - येणाऱ्या काळामध्ये भाजप पक्ष दुर्बिणीमधून शोधण्याची वेळ येईल

 

"त्या' वक्तव्याचा निषेध 
शासकीय कर्मचाऱ्यांची देणी देण्यासाठी शासन 50 हजार कोटींचे कर्ज काठ तर सर्वसामान्य वीज ग्राहकांचे वीज बिले भरण्यासाठी 8 ते 9 कोटींचे कर्ज जादा काढत नाही सर्वसामान्याची शासनाला कर दर नाही काय अशा उर्जामंत्र्यांनी वीज जोडणी तोडण्या भाषा करतात हे योग्य नाही अशा शब्दात श्री. साळेखे यांनी उर्जामंत्र्यांच्या त्या वक्तव्यांचा निषेध केला. 

संपादन - धनाजी सुर्वे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur electricity bill protest