निवडणूक कामात कोल्हापूर राज्यात पहिले 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रशासनाच्या पातळीवर सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेल्या जिल्ह्यात कोल्हापूरचा राज्यात पहिला क्रमांक आला आहे. याच अभियानात करवीर व कागल विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी व इतरांनी राज्यात अव्वल स्थान मिळवले आहे.

कोल्हापूर - नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रशासनाच्या पातळीवर सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेल्या जिल्ह्यात कोल्हापूरचा राज्यात पहिला क्रमांक आला आहे. याच अभियानात करवीर व कागल विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी व इतरांनी राज्यात अव्वल स्थान मिळवले आहे. विभागीय स्तरावर पुणे विभागात कागलने बाजी मारली आहे. राज्य निवडणूक आयोगाने ही माहिती आज प्रसिद्ध केली. 

हे पण वाचा - कोकण रेल्वेच्या समोर बिबट्या आला अन्...

भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक झाली. या निवडणुकीत काम केलेले अधिकारी, कर्मचारी यांनी त्यांच्या कामकाजाप्रती दिलेले योगदान विचारात घेऊन प्रभावी व उत्कृष्ट कामगिरी केलेले जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, उपजिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार होते. 

हे पण वाचा - कन्नड शाळेत समाजकंटकांचा धुडगूस ; वर्गखोल्यांच्या कुलुपांत घातले एम-सील

याबाबत मुख्य निवडणूक अधिकारी स्तरावर सर्व जिल्ह्यांचे गुणांकन करण्यात आले. त्यात विभागात पुणे विभाग तर जिल्ह्यात कोल्हापूर जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. राज्यात पहिल्या क्रमांकावर आलेल्या जिल्ह्यात कोल्हापूर जिल्ह्याला 100 पैकी 82.4 गुण मिळाले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर गडचिरोली तर तिसरा क्रमांक सांगली व औरंगाबाद जिल्ह्यांना विभागून दिला. 

इतर निकाल (कंसात मिळालेले गुण) 
विभागनिहाय उत्कृष्ट जिल्हे ः पुणे ः कोल्हापूर (82.4), नागपूर ः गडचिरोली (85.4), औरंगाबाद ः औरंगाबाद (80.8), कोकण ः रायगड (79.3), अमरावती ः अकोला (76.3), नाशिक ः नंदूरबार (73.7). 

ईव्हीएम, व्हीव्हीपॅटचे सर्वोत्कृष्ट काम 
राज्यस्तरीय ः प्रथम - पुणे विभाग - करवीर, द्वितीय - नाशिक-नेवासा, तृतीय - पुणे-कागल 
विभागीय स्तर ः पुणे- करवीर (26.95), नाशिक - नेवासा (26.40), नागपूर-आरमोरी (25.62), औरंगाबाद - घनसावंगी (23.72), अमरावती- जळगांव जामोद (23.44), कोकण - अलिबाग (23.32). 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur First in state in election work