esakal | कडक पोलिस बंदोबस्तात आंबेओहळ प्रकल्पाच्या घळभरणीला सुरवात  

बोलून बातमी शोधा

kolhapur gadhinglaj Ambeohol Project}

 धरणग्रस्त वाऱ्यावर सोडून पोलिस बंदोबस्तात हे काम सुरु आहे. यामुळे आधी पुनर्वसन मगच धरण या सरकारच्या कायद्याला हरताळ फासला आहे

कडक पोलिस बंदोबस्तात आंबेओहळ प्रकल्पाच्या घळभरणीला सुरवात  
sakal_logo
By
अशोक तोरस्कर

उत्तूर - कृष्णा खोरे विकास महामंडळाचा उत्तूर  (ता.आजरा) जवळील आंबेओहळ  प्रकल्पाच्या  घळभरणीला पोलिस बंदोबस्तात सुरवात झाली. यावेळी एकही धरणग्रस्थ उपस्थीत नव्हते.  ही घळभरणी दोन महिने चालणार आहे. प्रकल्पाच्या भिंतीच्या दोन्ही तिरावरील काम पूर्ण झाले आहे.

धळभरणीचे २ लाख ३६ हजार घन मीटर काम आहे. जूनला या प्रकल्पात पाणी अडविण्याचे नियोजन आहे. २६.९५ दलघमी पाणीसाठा व१००० हेक्टर सिंचन क्षेत्र निर्मितीचे उद्दीष्टे  आहे. घळभरणीला विरोध होईल हे गृहीत धरुन आज सकाळी ९ वाजता पोलिस सांचा फौजफाटा दाखल झाला. ११.३० वाजता सहाय्यक  पोलिस निरीक्षक  बालाजी भांगे यांच्या  मार्गदर्शनाखाली प्रकल्पस्थळावर पोलिस पोहचले. यापूर्वी या ठिकाणी साफसफाईचे काम सुरु होते. यानंतर थेट घळभरणीला सुरवात झाली. माती धरणाचे काम ८५% पूर्ण झाले आहे. या हंगामात १६५०० चौरस मीटर अश्मपटलाचे काम झाले आहे. धरणाची एकूण लांबी १९७५ मीटर आहे. उंची २७.७८ मीटर आहे. विद्युत विमोचकाचे पातनळ उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाच्या सांडव्याची लांबी इंग्रजी "सी" आकारात  १६० मीटर आहे. मध्यरेषेस समांतर लांबी ८० मिटर आहे. कालव्याची लांबी ११६० मीटर आहे. कालवा खुदाईचे काम ८५%  सांडवा संधानाचे ८०% काम पूर्ण आहे. 

हे पण वाचाअन्यथा महापालिकेला टाळे ठोकण्याचे आंदोलन ; संभाजी ब्रिगेडचा  इशारा

 धरणग्रस्त वाऱ्यावर सोडून पोलिस बंदोबस्तात हे काम सुरु आहे. यामुळे आधी पुनर्वसन मगच धरण या सरकारच्या कायद्याला हरताळ फासला आहे.
 ग्रामविकास मंत्री मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मागणीवरून हे काम सुरू आहे. 

-सदानंद व्हनबट्टे, अध्यक्ष  जनता दलन

नेतेमंडळीना धरणपुर्ततेचे श्रेय घ्यायचे आहे. म्हणूनच दादागीरीने हे काम सुरु केले आहे. २१ वर्षाच्या इतिहासातील हा काळा दिवस धरणग्रस्थांच्या वाट्याला आला आहे.
 -शंकर  पावले, माजी सरपंच आरदाळ   


संपादन - धनाजी सुर्वे