
शहरात नेहमीच राष्ट्रवादीचे आकर्षण राहिले आहे
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणुकचे बिगुल लवकरच वाजणार आहे.विविध राजकिय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरु केली आहे. शहराच्या सर्वच प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेसकडे इच्छुक उमेदवारांनी रांगा लावल्या आहेत.अशावेळी मंत्री हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन निवडणूक संदर्भात विविध विषयावर चर्चा केली.
यावेळी मंत्री मुश्रीफ म्हणाले, शहरात नेहमीच राष्ट्रवादीचे आकर्षण राहिले आहे. जनता नेहमी आमच्या पाठीशी असते, कारण दिलेला शब्द पाळण्याची आमची प्रथा जनतेला माहिती आहे. साहाजिक उमेदवारांचा ओढ राष्ट्रवादीकडे आहे. अशा वेळी योग्य उमेदवाराची निवड करून जनतेचे काम व भागाचा विकास केला जावा यासाठी एक समिती (कोअर कमिटी) निवडावी. महानगरपालिकेचे 81 प्रभाग मोठ्या ताकदीने राष्ट्रवादी पार्टी लढवणार आहे.
यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील, माजी नगरसेवक राजेश लाटकर, आदिल फरास, सरचिटणीस सुनिल देसाई, उत्तम कोराणे, अजित राऊत, संजय कुराडे, विनायक फाळके, संदीप कवाळे महेंद्र चव्हाण यांची समिती निवडण्यात आली आहे.
संपादन - धनाजी सुर्वे