Kolhapur municipal water pump pump expires kolhapur marathi news
Kolhapur municipal water pump pump expires kolhapur marathi news

कोल्हापूर महापालिकेचे पाणी उपसा पंपच कालबाह्य...

कोल्हापूर - महापालिका पाणीपुरवठा विभागाकडील पाणीपुरवठा उपसा करणारे पंपच कालबाह्य झाले आहेत. २०११ लाच पंपाची उपसा करण्याची क्षमता संपली असून आता नव्याने पंप बसविण्यासाठी साडेसात कोटींचा प्रस्ताव पाणीपुरवठा विभागाने तयार केला आहे. शिंगणापूर पाणी योजनेचे पाच पंप आहेत. पैकी एक बंद आहे आणि चार सुरू आहेत. २००६ ला शिंगणापूर योजना महापालिकेकडे हस्तांतरित झाली. पंपाची क्षमता ही पंधरा वर्षच असते. शिंगणापूरचे पाचही पंप कालबाह्य झाले असून त्याचा परिणाम म्हणून नदीतून पुरेशा क्षमतेने पाण्याची उचल होत नाही. तेथून पाणी कमी मिळाल्यानंतर उपसा केद्रात ते पुरेसे साठत नाही. पुढे पाणी साठविण्याच्या टाकीतही पाणी कमी पडते. गेल्या काही दिवसांपासून ई वॉर्ड तसेच उपनगराला अपुरा पाणीपुरवठा होत आहे त्यामागे नदीतील पाण्याच्या पातळीबरोबर पंपाची अकार्यक्षमताही कारणीभूत आहे. यातील एक पंप जरी बंद पडला, तरी त्याचा परिणाम शहर पाणीपुरवठ्यावर होतो. शिंगणापूर बंधाऱ्याला लागलेल्या गळतीमुळे बंधाऱ्यात पाणी टिकून राहत नाही, ते पुढे वाहून जाते. पंपालगत पाण्याची पातळी न मिळाल्यास त्याचाही परिणाम पाणी उचलण्यावर होतो. 

पंप नव्याने बसवावे लागणार

बालिंगा पाणी उपसा केंद्र जुने झाल्याने तेथील पंपाचे आर्युमान आता संपत आले आहे. बालिंगा उपसा केंद्र सक्षम असले तरी आज ना उद्या येथील पंप नव्याने बसवावे लागणार आहेत. नागदेववाडी येथे इंटकवेलचा काही भाग कोसळला आहे तो दुरूस्त करून घ्यावा लागणार आहे बालिंगा फिल्टरहाऊसजवळ पाण्याची मोठी गळती आहे. काळम्मावाडी थेट पाईपलाईनच्या कामाची गती पाहता आणखी दीड ते दोन वर्षे शहरापर्यंत पाणी पोहचण्याची शक्‍यता नाही. त्यामुळे बालिंगा तसेच शिंगणापूर उपसा केंद्रे अधिक सक्षम करावी 
लागणार आहेत. 

शिंगणापूर योजनेसाठी पाणी उपसा करणाऱ्या पंपाचे आयुर्मान संपले आहे. जेमतेम १५ वर्षे पंप क्षमतेनुसार पाणी उपसा करू शकतात. त्यांची मुदत २०११ लाच संपली आहे. त्यामुळे नव्याने पंप बसवावे लागणार आहेत. त्यासाठी साडेसात कोटींचा प्रस्ताव तयार केला असून जिल्हा नियोजन समितीकडून निधी मिळविण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे.
- भास्कर कुंभार, प्रभारी जलअभियंता


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com