कोल्हापूरमध्ये मुस्लीम बांधवांनी केली कोरोनामुक्तीसाठी दुआ ...

In Kolhapur Muslims prayed for coronation
In Kolhapur Muslims prayed for coronation

कोल्हापूर : मुस्लीम धर्मीयांची पवित्र रमजान ईद आज शहर आणि परिसरात साधेपणाने साजरी झाली. राष्ट्रीय एकात्मता, विश्‍वशांतीबरोबरच कोरोनामुक्तीसाठी यावेळी दुआ करण्यात आली. मुस्लीम बोर्डिंगसह शहर परिसरातील सर्व मशिदीमध्ये केवळ चार जणांच्याच उपस्थितीत नमाज पठण झाले.


कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून नमाज अदा करण्यात आली. कोरोनाबाधितांची प्रकृती लवकरात लवकर सुधारून त्यांचे जीवन आरोग्यदायी होवो आणि एकूणच जगभरातून कोरोना समूळ नष्ट होवू दे, अशी प्रार्थना यावेळी झाली. मुस्लीम समाजाने यंदा ईद साधेपणाने साजरी करावी. ईदचा खर्च टाळून समाजातील गरजू, गरिबांना महिन्याचे जीवनावश्‍यक साहित्य द्यावे, औषधे, महिन्याचे घरभाडे द्यावे, असे आवाहन मुस्लीम बोर्डिंगने केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत आज समाजाने मदतीची परंपरा यंदाही जपली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com