कोल्हापुरात साडेपाच हजारांवर कनेक्‍शन तोडले तर जयसिंगपुरातत अधिकाऱ्यास शिवीगाळ

In Kolhapur over five and a half thousand electricity connection cut off marathi news
In Kolhapur over five and a half thousand electricity connection cut off marathi news

कोल्हापूर : लॉकडाउन काळातील वीजबिल थकबाकीपोटी आजपर्यंत जिल्ह्यातील पाच हजार ८४९ ग्राहकांचे कनेक्‍शन तोडले आहेत. जिल्ह्यातील तीन हजार २९९ ग्राहकांची पुनर्जोडणी झाली असून, ‘महावितरण’तर्फे थकबाकीपोटी कनेक्‍शन तोडण्याची मोहीम थांबलेली नाही.

लॉकडाउनच्या काळातील बिले भरण्याचे आवाहन महावितरणतर्फे सातत्याने केले जात आहे. मार्चअखेरपर्यंत शंभर टक्के वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करायचे असल्याने कर्मचारी कनेक्‍शन तोडण्याच्या कामात व्यस्त आहेत. दोन महिन्यात कनेक्‍शन्स तोडण्याची प्रक्रिया वेगाने राबविण्यात आल्याने ग्राहकांकडून बिले भरण्याचे प्रमाणही वाढले. ज्या ग्राहकांनी वीज बिल भरण्यात टाळाटाळ केली, त्यांची कनेक्‍शन्स मात्र तोडण्यात हयगय केली नाही. जिल्ह्यातील पाच हजार ८४९ ग्राहकांना कनेक्‍शन तोडण्याच्या प्रक्रियेला सामोरे जावे लागले. या कनेक्‍शनची जोडणी करण्याकरिता ग्राहकांना पुनर्जोडणीचा खर्चही द्यावा लागला आहे.

जयसिंगपुत अधिकाऱ्यास शिवीगाळ
आमच्या घराचे वीज कनेक्‍शन तोडणाऱ्या वायरमनवर फौजदारी करतो, असे म्हणून ‘महावितरण’चे अधिकारी मदन रामदार कडाळे यांच्यावर अंगावर धावून जाऊन शिवीगाळ व शासकीय कार्यालयात गोंधळ घालून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी शरद शंकरराव चौगुले (जयसिंगपूर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना आज दुपारी बाराच्या सुमारास घडली. जयसिंगपूर पोलिस अधिक तपास करीत आहेत.

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com