सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना कोल्हापूर पोलिसांचा दणका 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 15 September 2020

कोरोनाचे संकट गडद होत आहे. दररोज जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बाधितांची संख्या वाढत आहे

कोल्हापूर - सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांसह विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाईची धडक मोहीम शहर वाहतूक पोलिसांनी हाती घेतली. आज तब्बल 188 जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून 18 हजारांहून अधिकचा दंड वसूल केला. 

कोरोनाचे संकट गडद होत आहे. दररोज जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बाधितांची संख्या वाढत आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर शहरासह जिल्ह्यात सोशल डिस्टन्सिंगचा भंग, विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकू, धुप्रमान करू नये अशा सूचनाही दिल्या जात आहेत. पण त्याकडे सहसा कोणी लक्ष देत नाही. याकडे "सकाळ'ने "पिचकारी नव्हे, तर कोरोनाचे स्फोटकच' या शीर्षकाखाली प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केला. पालिका प्रशासनाबरोबर आता पोलिस प्रशासन नियम व सूचनांचा भंग करणाऱ्यांवर कारवाईसाठी पुढे आले आहे.

हे पण वाचाकोरोनाबाधितांची संख्या अद्यापही वाढतीच ; जाणून घ्या कोल्हापूरची सद्य परिस्थिती

 

शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या उपनिरीक्षक अनिता मेणकर यांच्या नेतृत्वाखाली आज शहर परिसरात विनामास्क, सोशल डिस्टन्सिंगचा भंग आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर कारवाईची मोहीम राबविली. यात 188 जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून 18 हजार 800 रूपयांचा दंड आज वसूल केला. तसेच संबधितांना मास्कचेही वाटप केले. दरम्यान इचलकरंजीत 101 जणांवर कारवाई करून संबधितांकडून 10 हजार 100 रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur police Action on 188 persons