कोरोनाबाधितांची संख्या अद्यापही वाढतीच ; जाणून घ्या कोल्हापूरची सद्य परिस्थिती 

शिवाजी यादव 
Tuesday, 15 September 2020

 गंभीर अवस्थेतील मोजक्‍याच व्यक्ती गंभीर आहेत. त्यांना मात्र सीपीआरकडे पाठविले जात आहे

कोल्हापूर - जिल्ह्यात सोमवारी रात्री बारापासून या क्षणापर्यंत 125 नवीन कोरोनाबाधित सापडले आहेत. त्यांच्यावर 14 कोवीड सेंटरमध्ये उपचार सुरू झाले आहेत. तर जवळपास 146 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. गेल्या 24 तासात 8 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यूंची संख्या 1096 झाली आहे. एकूण कोरोनाबाधितांची संख्या 35 हजार 659 तर कोरोनामुक्तांची संख्या 23 हजार 308 झाली आहे.

गेल्या महिन्यभरात बहुतांशी प्रमाणात कोल्हापूर शहर, करवीर, हातकणंगले, शिरोळ या भागातील कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. यातही जवळपास 145 व्यक्ती गंभीर आहेत. त्यांच्यावर सीपीआर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. 

गेल्या महिन्यात आजरा, चंदगड, गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा या डोंगरी तालुक्‍यातील कोरोनाबाधितांची संख्या जास्त होती. त्यावर नियंत्रण मिळविण्यात बऱ्यापैकी यश आले आहे असे असताना आजरा, राधानगरी तालुक्‍यात गेल्या 24 तासात आणखी 100 बाधितांची भर पडल्याने या भागात चिंता पून्हा वाढली आहे. 
ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या जास्त आहे. मात्र यात 90 टक्‍क्‍या पेक्षा अधिक व्यक्ती सौम्य व मध्यम लक्षणे असल्याने त्यांना अवती भोवतीच्या तालुका कोवीड सेंटर मध्ये उपचार केले जात आहेत. 

हे पण वाचा कोल्हापुरातील मराठा आंदोलन भरवणार शासनाला धडकी

 गंभीर अवस्थेतील मोजक्‍याच व्यक्ती गंभीर आहेत. त्यांना मात्र सीपीआरकडे पाठविले जात आहे असे असूनही सीपीआर मध्ये 448 बेड आहेत. यातील आज वीस बेड रिकामे झाले होते. त्यावर नवे बाधित उपचारासाठी दाखल झाले. त्यामुळे सीपीआर पून्हा एकदा हाऊस फुल्ल होत आहे. बेड उपलब्ध करण्यासाठी आरोग्य यंत्रणा प्रयत्नशील आहे. 

हे पण वाचा7899 हाच नंबर ठरला ॲड. शिंदे यांच्यासाठी विजयाची निशाणी  

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new 125 corona patients in kolhapur