धक्कादायक ; खून प्रकरणातील संशयिताच्या पत्नीने अल्पवयीन मुलाचे अपहरण करून त्याच्यावर...

kolhapur police investigation of Minor child abduction case
kolhapur police investigation of Minor child abduction case

इचलकरंजी - येथील साईट नं. १०२ मधून अल्पवयीन मुलाच्या अपहरण प्रकरणाचा छडा लावण्यात गावभाग पोलिसांना यश आले. याप्रकरणी परिसरातील राधा बच्चन ऊर्फ राजकुमार कांबळे महिलेला कोल्हापूर येथून अटक केली. तिने अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. तिला न्यायालयाने एक जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. राधा ही किशोर नेटके खूनप्रकरणी अटकेत असलेला मुख्य संशयित राजकुमार ऊर्फ बच्चन लक्ष्मण कांबळे याची पत्नी आहे.

येथील आसरानगर परिसरातील साईट नं. १०२ मधील अल्पवयीन मुलाचे अपहरण झाल्याबाबतची तक्रार २४ सप्टेंबर रोजी गावभाग पोलिसांत दाखल होती. अपहृत मुलगा सोलापूर येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने सोलापूर येथून मुलास ताब्यात घेतले. मुलाकडे चौकशी केली असता राधा कांबळे हिने इचलकरंजीतून अपहरण करून तामिळनाडू येथे घेऊन गेल्याचे सांगितले. राधा हिने या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानंतर राधा हिला कोल्हापूर येथून ताब्यात घेऊन अटक केली. 

दरम्यान, तीन महिन्यांपूर्वी किशोर नेटके याचा बच्चन कांबळे याने साथीदारांच्या मदतीने खून केला होता. या घटनेतील अल्पवयीन मुलगा हा नेटके याचा नातेवाईक आहे. राधा ही बच्चन कांबळे याची पत्नी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com