छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली जगदंबा तलवार भारतात आणावी; कोल्हापुरात रास्ता रोको

kolhapur protest shivaji maharaj jagdamba sword
kolhapur protest shivaji maharaj jagdamba sword

शिरोली पुलाची : छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली जगदंबा ही तलवार इंग्लंड येथील राणीच्या वैयक्तिक संग्रहालयात रॉयल कलेक्शन ट्रस्ट येथे ठेवण्यात आली आहे. ही तलवार परत आणण्यासाठी राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री यांना मेल आणि पत्रे पाठवली आहेत. मात्र आद्याप त्याची दखल घेतलेली नाही. यामुळे पुणे येथे २३ मार्च रोजी होणाऱ्या भारत–इंग्लंड सामन्यावेळी इंग्लड संघासमोर निदर्शने करण्याचा इशारा शिवदुर्ग संवर्धन आंदोलनाचे प्रमुख हर्षल सुर्वे यांनी दिला आहे.


छत्रपती शिवाजी महाराज यांची जगदंबा तलवार इंग्लंडमधून भारतात आणावी या मागणीसाठी ‘शिवदुर्ग संवर्धन आंदोलन'तर्फे तावडे हॉटेल चौकात निदर्शन करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यानी महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.

छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव उच्चारताच मराठी माणसाची छाती अभिमानानं फुलून येते. महाराजांच्या पराक्रमानं पावन झालेली जगदंबा तलवार ही देशाची अस्मिता आहे. ही तलवार कोल्हापूरचे चौथे शिवाजी महाराज यांनी १८७५ मध्ये तत्कालीन ब्रिटिश युवराज प्रिन्स ऑफ वेल्स याला भेट दिली होती. ती ब्रिटनच्या राणीच्या संग्रहालयात आहे. हा ऐतिहासिक ठेवा देशात परत आणण्याची मोहीम ‘शिवदुर्ग संवर्धन आंदोलन'ने हाती घेतली आहे. आज ‘शिवदुर्ग संवर्धन आंदोलन'ने तावडे हॉटेल येथे महामार्ग रोखो आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. छ्त्रपती शिवाजी महाराज की जय, तलवार आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची, शिवबांची तलवार आलीच पाहीजे, कल लढे थे मुघलोंसे- आज लढे गे गोरोसे, इंग्लंड टीम गो बॅकच्या घोषणा देत कार्यकर्ते रस्त्यावर आले. तावडे हॉटेल चौकत निदर्शने केल्यानंतर कार्यकर्ते महामार्ग रोखण्यासाठी जात असताना, पोलिसांनी कार्यकर्त्याना ताब्यात घेतले.

प्रदीप हांडे, सागर पाटील, शुभम जाधव, विशाल खोचिकर, शरद चौगुले, अमृता सावेकर, केतन पाटील, अक्षय चाबूक, विशाल पाटील, गणेश खोचिकर, प्रमोद नाईक, पवन तोरस्कार, अमोल चौगुले , संतोष चौगुले, अर्जुन संकपाळ,  प्रथमेश खाडे, अतुल सोंनगेकर, विजय दरवान, योगेश पोवार, प्रशांत जगताप, कृष्णात जगताप, गणेश पांडव, आदेश शेळके, प्रथमेश शिदे, किरण रामाने, किरण पोवार योगेश नाईक, अजीत पोवार, आदीत्य हांडे, शुभम गुरव, सुहास मिसाळ आदी कार्यकर्त्यानी आंदोलनात भाग घेतला.


शिवरायांची तलवार परत आणण्यासाठी आंदोलन, चळवळी, निदर्शने, गनिमी कावे अशा विविध मार्गाने आंदोलन करत राहू.

-हर्षल सुर्वे

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com