कोल्हापूरच्या सुपुत्राचा भोपाळमध्ये झेंडा 

संदीप खांडेकर 
Tuesday, 26 January 2021

विकास मूळचा गवशी पैकी पाथरेवाडी (ता. राधानगरी) येथील आहे. तो सध्या न्यू काॅलेजमध्ये कला शाखेच्या पहिल्या वर्गात शिकत आहे

कोल्हापूर : भोपाळ (मध्य प्रदेश) येथे सुरू असलेल्या अठराव्या राष्ट्रीय सब ज्युनिअर अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत विकास आनंदा खोडके याने ११० मीटर हर्डल्स प्रकारात स्पर्धा विक्रमासह प्रथम क्रमांक पटकाविला. त्याने १४ सेकंदात निर्धारीत अंतर पूर्ण केले. तो मोमेंटम अॅकॅडमीचा खेळाडू आहे. 

विकास मूळचा गवशी पैकी पाथरेवाडी (ता. राधानगरी) येथील आहे. तो सध्या न्यू काॅलेजमध्ये कला शाखेच्या पहिल्या वर्गात शिकत आहे. आंतरराष्ट्रीय वरिष्ठ अॅथलेटिक्स प्रशिक्षक सुभाष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पाच वर्षे सराव करत आहे. यापूर्वी त्याने खेलो इंडिया १०० बाय ४ रिले प्रकारात रौप्य, तर ११० मीटर हर्डल्समध्ये शालेय राष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक मिळविले होते. त्याला‌ प्राचार्य महाराजकुमार मालोजीराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती, प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील, प्रा. अमर सासने, दिग्विजय मळगे, महेश पवार यांचे प्रोत्साहन मिळाले.

हे पण वाचाVideo - काँग्रेस पक्ष रसातळाला का गेला? राजू शेट्टी यांनी सांगितले कारण

 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur soon Vikas Khodke won in Junior Athletics Championship