...त्यामुळे जिल्हा परिषदेचा समाजकल्याण विभाग झाला होम क्‍वारंटाईन 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 3 August 2020

समाजकल्याण अधिकाऱ्यांनाच कोरोना झाल्याने कर्मचारी व अधिकारी हडबडून गेले आहेत.

कोल्हापूर - जिल्हा परिषद मुख्यालयात पुन्हा एकदा कोरोनाने धडक दिली आहे. जिल्हा समाजकल्याण अधिकारीच कोरोना पॉझिटिव्ह आल्याने कार्यालय क्‍वारनटाईन केले. कार्यालयात फक्‍त एक कर्मचारी उपस्थित आहे. यापुर्वी जिल्हा परिषद उपाध्यक्ष, त्यांचा स्वीय सहाय्यक, चालक, ग्रामपंचायत विभागाचा कर्मचारी, भुदरगड पंचायत समितीचे सहा तर कागल पंचायत समितीचा एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्हा आला आहे. 

जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत असताना आता सरकारी कार्यालयातही कोरोनाचे रुग्ण सापडू लागले आहेत. जिल्हा परिषदेत तर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून लोक येत असतात. त्यामुळे खबरदारीच्या उपाययोजना राबवल्या जात आहेत. त्यातूनही सुरुवातीलाच कागलकर हाउस येथील कर्मचारी बाधित आढळला. यानंतर उपाध्यक्ष, पंचयात समितीचे कर्मचारी कोरोनाने बाधित झाले. यामुळे जिल्हा परिषदेत अभ्यागतांना बंदी केली. तालुक्‍यातून टपाल देण्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून प्रवेशदवारातूनच टपाल घेण्याची व्यवस्था केली. 

कोरोनाला रोखण्यासाठी जिल्हा परिषद नवनवीन उपक्रम राबवत असतानाच आज जिल्हा समाजकल्याण अधिकाऱ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. जिल्ह्यात अपंग कोरोना रुग्णांची व्यवस्था करण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर आहे. गेली चार महिने ते जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात कोरोनाच्या अनुषंगाने फिरत आहेत. दोन दिवसापुर्वी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्यांच्यावर आता उपचार सुरु आहेत. तसेच या विभागातील सर्वच कर्मचाऱ्यांना क्‍वारनटाईन केले आहे. 

कार्यभार कोणाकडे? 
समाजकल्याण अधिकाऱ्यांनाच कोरोना झाल्याने कर्मचारी व अधिकारी हडबडून गेले आहेत. समाजकल्याण विभागाच्या दिशेने अपवाद वगळता आज कोणीच फिरकले नाही. दरम्यान एका पदाधिकाऱ्याकडून वारंवार अतिरिक्‍त कारभाराबाबत विचारणा सुरू झाली आहे. जिल्हा परिषदेचे विविध खातेप्रमुख कोरोनाच्या कामात आहेत. त्यामुळे सहाय्यक आयुक्‍तांकडे हा कारभार जाण्याची शक्‍यता आहे. 

पेठवडगावच्या नगराध्यक्षांच्या घरातील दोघे जण पाॅझिटिव्ह

वडगाव नगराध्यक्षांच्या घरातील दोघांचे कोरोना आहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. नगराध्यक्षांच्या आईचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे अनेक नागरिक त्यांचे सांत्वन करण्यास आले होते. त्यातूनच त्यांना संसर्ग झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे पण वाचा हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार हाजी असलम सय्यद यांच्यावर बलत्काराचा गुन्हा... 

 काही दिवसांपूर्वी नगराध्यक्षांच्या घरातील दोघांना ताप, थंडीचा त्रास सुरु झाला. यानंतर डॉक्टरांच्या सल्याने त्यांचा खाजगी लॅबमध्ये स्वॅब देण्यात आला. या स्वॅबचा आहवाल आज दुपारी पॉझिटीव्ह आला. आहवाल आल्यानंतर पालिका प्रशासनाची तारांबळ उडाली. प्रशासनाने नविन वसाहतीस जाणारे सर्व मार्ग बंद केले आहेत. घर आणि घराच्या परिसरात औषध फवारणी केली जात आहे. कुटूंबातील तर सदस्यांचेही स्वॅब घेतले जाणार आहेत. याशिवाय संपर्कातील अनेकांना क्वारंटाईन केले आहे. पॉझिटीव्ह आलेल्या दोघांवर खाजगी रुग्नालयात उपचार सुरु आहेत. गेल्या चार दिवसाच्या कालावधीत नगराध्यक्षांचे सांत्वन करण्यासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी असल्यामुळे अनेकांचे धाबे दनानले आहेत. 

संपादन - धनाजी सुर्वे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur zilla parishad offers corona positive