कोल्हापुरात रमाई घरकुलला निधीची टंचाई

प्रतिनिधी
गुरुवार, 28 मे 2020

अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांसाठी रमाई घरकुल योजना राबवली जाते. समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्‍त यांच्याकडून या योजनेसाठी आराखडा तयार केला जातो. पात्र लाभार्थ्याला 1 लाख 20 हजार रुपयांचा निधी दिला जातो. चार हप्त्यांमध्ये हा निधी देण्यात येतो. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून याचे नियंत्रण केले जाते. मात्र, सन 2016-17, 2017-18 तसेच सन 2018-19 सालात मंजूर करण्यात आलेल्या घरकुलांचे अनेक हप्तेच देण्यात आलेले नाहीत. शिरोळ तालुक्‍यात 170 लाभार्थ्यांना 2016-17 पासूनचे हप्ते मिळालेले नाहीत. तर 2019-20 सालात 171 लाभार्थ्यांना घरकुल मंजूर असले तरी निधी मिळालेला नाही. उर्वरित तालुक्‍यातही अशीच परिस्थिती आहे.

कोल्हापूर : रमाई घरकुल आवास योजनेसाठी निधी उपलब्ध होत नसल्याने लाभार्थी चिंतेत आहेत. पावसाळा तोंडावर आला असून या योजनेतील अनेक घरांचे बांधकाम अर्धवट अवस्थेत आहे. मात्र, निधी मिळत नसल्याने या घरांचे बांधकाम करायचे कसे, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या घरकुलांचे 2016-17 पासूनचे ते 2019-20 सालातील अनेक लाभार्थ्यांचा निधी मिळालेला नाही. तर 2019-20 सालासाठी 1900 घरे मंजूर झाली असली तरी त्यांनाही निधी मिळत नसल्याने लाभार्थ्यांमध्ये नाराजी आहे.
अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांसाठी रमाई घरकुल योजना राबवली जाते. समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्‍त यांच्याकडून या योजनेसाठी आराखडा तयार केला जातो. पात्र लाभार्थ्याला 1 लाख 20 हजार रुपयांचा निधी दिला जातो. चार हप्त्यांमध्ये हा निधी देण्यात येतो. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून याचे नियंत्रण केले जाते. मात्र, सन 2016-17, 2017-18 तसेच सन 2018-19 सालात मंजूर करण्यात आलेल्या घरकुलांचे अनेक हप्तेच देण्यात आलेले नाहीत. शिरोळ तालुक्‍यात 170 लाभार्थ्यांना 2016-17 पासूनचे हप्ते मिळालेले नाहीत. तर 2019-20 सालात 171 लाभार्थ्यांना घरकुल मंजूर असले तरी निधी मिळालेला नाही. उर्वरित तालुक्‍यातही अशीच परिस्थिती आहे.

गतवर्षी महापूर आला त्यात शिरोळ तालुक्‍यातील 3400 घरं पडली आहेत. यातील 350 घरं ही रमाई योजनेतील आहेत. या लोकांनी रमाई योजनेतून घराच्या बांधकामास सुरुवात केली आहे. मात्र, आता निधी नसल्याने ही घरे अर्धवट अवस्थेत आहेत. त्यामुळे महापूर आला तर ही घरं पुन्हा पाण्याखाली जाण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे हे लोक उघड्यावर येणार आहेत. घरे अर्धवट असणाऱ्यांनी करायचे काय? शाळेत रहायचे तर कोरोनाग्रस्त थांबले आहेत, त्यामुळे त्यांनी जायचे कुठे, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 
- सुरेश कांबळे, सामाजिक कार्यकर्ते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lack of funds for Ramai Gharkul