esakal | बाजार समितीचा सफाई ठेका वादाच्या भोवऱ्यात

बोलून बातमी शोधा

The market committee's cleaning contract is in the midst of controversy}

कोल्हापूर  ः शेती उत्पन्न बाजार समितीच्या शाहू मार्केट यार्डात साफसपाईचा ठेका मर्जीतील व्यक्तींना दिला आहे. निविदा काढण्याचे नियम धाब्यावर बसविण्यात आले आहेत, अशा आशयाची तक्रार जिल्हा निबंधकाकडे दाखल झाली आहे. त्याआधारे या निविदा प्रकरणाचा खुलासा करण्याचे आदेश जिल्हा उपनिंबधक अमर शिंदे यांनी दिले आहेत. 

kolhapur
बाजार समितीचा सफाई ठेका वादाच्या भोवऱ्यात
sakal_logo
By
शिवाजी यादव

कोल्हापूर  ः शेती उत्पन्न बाजार समितीच्या शाहू मार्केट यार्डात साफसपाईचा ठेका मर्जीतील व्यक्तींना दिला आहे. निविदा काढण्याचे नियम धाब्यावर बसविण्यात आले आहेत, अशा आशयाची तक्रार जिल्हा निबंधकाकडे दाखल झाली आहे. त्याआधारे या निविदा प्रकरणाचा खुलासा करण्याचे आदेश जिल्हा उपनिंबधक अमर शिंदे यांनी दिले आहेत. 

शेती उत्पन्न बाजार समितीत विविध शेतीमालाचे घाऊक बाजारपेठ आहे. येथे रोज शेतीमालाचे सौदे होतात. बहुतांशी शेतीमाल परजिल्ह्यातून येथे येतो. सौदे झाल्यानंतर हा माल विविध भागात विक्रीसाठी पाठवला जातो. यासर्व प्रक्रीयेत खराब शेतीमालाचा कचरा पडतो. हा कचरा साफ करण्यासाठी खासगी व्यक्ती, संस्थाना ठेका दिला जातो. त्यासाठी यंदा निविदा प्रक्रीया बाजार समितीत झाली. त्यावर आक्षेप घेत एका संस्थेने जिल्हा निबंधकाकडे तक्रार दिली आहे. 
या तक्रारीतील माहिती अशी की, बाजार समितीची निविदा प्रक्रिया ऑफ लाईन पध्दतीने होणार होती. या निविदा प्रक्रियेत पाच निविदाधारक होते. टेंडर खुले करण्याची प्रक्रिया या निविदाधारकांसमोर होणे अपेक्षित होते. मात्र समितीनेही निविदा परस्पर उघडल्या. ही बाब चुकीची आहे. निविदा खुली केल्यानंतर एकेका निविदाधारकाला बैठकीसाठी बोलवले. ज्याला निविदा द्यायची होती. त्या व्यक्तीना सर्वात शेवटी बोलवले. त्याच व्यक्तीला ठेका दिला आहे. 
संबधीत व्यक्तीकडे सफाई कामे घेण्याची कोणत्याही प्रक्रारची कागदपत्रे नाहीत. या दोन वेगवेगळ्या व्यक्तीना टेंडर दिली आहेत. यातील एक व्यक्ती बाजार समितीत नोकरी करणारी आहे तर दुसरी व्यक्ती संचालकांच्या मर्जीतील आहे. तर या दोन्ही व्यक्तीनी दुसऱ्यांच्या नावे निविदा भरली आहे. यातील एकाच व्यक्तीकडे सलग सात ते आठ वर्षे निविदा आहे. तरी या निविदा प्रक्रीये संदर्भात चौकशी व्हावी, अशी मागणी सफाई काम संस्थेने लेखी पत्राव्दारे केली आहे. 

तक्रारीच दखल 
दरम्यान याबाबत जिल्हा निबंधक अमर शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, "" सफाई कामाच्या ठेक्‍या संदर्भात तक्रार दाखल झाली आहे. त्याची दखल घेतली आहे. बाजार समितीने या संदर्भात खुलासा करावा असे आदेश आहेत.''