Video - मनसेकडून कोल्हापूर महापालिकेच्या कारभाराची घोडे, हलगी आणि बॅंडच्या तालावर वरात

मोहोन मेस्त्री 
Thursday, 24 September 2020

शहरातील पाईपलाईन बदलण्याचे सुमारे 115 कोटीचे काम दास आणिं कंपनीला देण्यात आले आहे.पण हे काम टेंडरनुसार केले जात नाही, शहरातील रस्ते खूदाईने नागरीक हैराण झाले आहेत. 

कोल्हापूर : शहरातील पाणीपुरवठा पाईप लाईन बदलण्याचे काम दास आणि कंपनी निकृष्ठ दर्जाचे करत आहे. याबाबत मनसेतर्फ़े महापालिका आयुक्तांना व्हिडीओ द्वारे पुरावे दाखल करुनही कंपनीवर कोणतीही कारवाई होत नाही या निषेधार्थ मनसे पक्षातर्फे घोडागाडी बग्गी, बॅंड आणि वाद्याच्या तालावर आगळा वेगळा रुखवत मोर्चा काढून निदर्शने केली. 

शहरातील पाईपलाईन बदलण्याचे सुमारे 115 कोटीचे काम दास आणिं कंपनीला देण्यात आले आहे.पण हे काम टेंडरनुसार केले जात नाही, शहरातील रस्ते खूदाईने नागरीक हैराण झाले आहेत. वाहन चालवणे काय तर चालणेही अवघड झाले आहे, असा आरोप मनसेचे राजू जाधव यांनी केला. यापूर्वीही हे काम निकृष्ठ असल्याचे महापालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणले होते. पण महापालिकेने याबाबत कंपनीला कोणतीही सूचना देण्यात आली नाही. शहरातील गणेश मंडळांकडून प्रत्येक खड्ड्याला शेकडो रुपये वसूल करत असते. मग या कंपनीने केलेल्या बेलगाम खूदाईकडे प्रशासन दुर्लक्ष का करत आहे असा प्रश्‍न निवेदनाद्वारे करण्यात आला आहे. पाईपलाईनची खूदाई केल्यानंतर तेथे सपाटी करण न केल्याने शहरवासियांना चिखलातून मार्ग काढावा लागत आहे. अनेक ठिकाणी खड्डे तसेच ठेवले आहेत. याचा निषेध करत मनसे तर्फ़े या खड्ड्यातील माती, निकृष्ठ माती, वाळु आणि सिंमेंट याचा एखघद्या लग्नाप्रमाणे फ़ूलांच्या दुरडीतून रुखवत मांडून महिलांसोबत नेण्यात आला. यावेळी घोडे, हलगी आणि बॅंडच्या तालावर हा मोर्चा महापालिकेवर नेण्यात आला.

हे पण वाचा -  ऐन परीक्षेच्या तोंडावर शिवाजी विद्यापीठ प्रशासनाचे आंदोलन, कामकाजावर बहिष्कार

महापालिकेच्या दारासमोर हा सर्व रूखवत मांडून कंपनीच्या कामाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आयुक्त, अथवा महापौर यांनी मोर्चाला सामोरे यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी राजू बागवान, कृष्णात दिंडे. बबन सावरे, अमित फ़राकटे, किरण पोतदार, बापू चव्हाण, अजय चौगुले, माया खानविलकर, अंजना शहा, मनिषा क्षीरसागर, राजू माने, शिवाजी पाटील आदि उपस्थित होते. 

हे पण वाचाराजू शेट्टींची ७२२७ देतेय साथ देण्याचा संदेश  

 

व्हिडिओ पाहा - 

संपादन - धनाजी सुर्वे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mns protest on kolhapur municipal corporation