esakal | पर्यटनाला जाताय ? कोल्हापुरातील पंडिवरे, बसुदेव पठार पाहिलंय का ?
sakal

बोलून बातमी शोधा

nature's beauty of bhudargad table lamp are in kolhapur various flowers and attract to tourist

भुदरगड तालुक्यातील पश्चिम व उत्तर भागाला असे निसर्गाचे अनोखे वरदान लाभले आहे.

पर्यटनाला जाताय ? कोल्हापुरातील पंडिवरे, बसुदेव पठार पाहिलंय का ?

sakal_logo
By
अरविंद सुतार

कोनवडे (कोल्हापूर) : निसर्गाचे वरदान लाभलेल्या भुदरगड तालुक्यात निसर्गसंपन्न मिणचे खोऱ्यातील पंडिवरे येथील 'भोंगिरा' व बसुदेव मंदिरावरील पठारावर विविध प्रकारची रानफुले बहरली आहेत. जणू या दोन्ही पठारांवर विविध रंगांच्या फुलांचा साज चढला आहे. या वातावरणामुळे पठारचा परिसर मनाला आनंद देत आहे. भुदरगड तालुक्यातील पश्चिम व उत्तर भागाला असे निसर्गाचे अनोखे वरदान लाभले आहे. 

हेही वाचा -  नव्वद टक्के कोचिंग क्लासेस डबघाईला ; चालकांच्या चिंतेत वाढ -

दरवर्षी निसर्गप्रेमी व पर्यटक निसर्गसौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी पठारांवर येतात. यंदा दमदार पावसामुळे निसर्गाने सौंदर्याची मुक्त उधळण केली आहे. पंडिवरे, टिक्केवाडीच्या डोंगरकड्यांवर असलेली गुहा 'भोंगिरा' येथे अनेक शिवभक्तांसह निसर्गप्रेमी भेट देतात तर डोंगराच्या कुशीत असणारे बसुदेव मंदिर परिसर मनाला आनंद देतो. या पठारावरून काळम्मावाडी जलाशयाचे मन मोहित करणारे दृश्य दिसते. 

बसुदेव व पंडिवरे ही दोन्ही पठारं विविध रंगातील रानफुलांनी बहरून गेली आहे. ऑगस्ट ते ऑक्टोबर हा फुलांचा हंगाम असतो. यावर्षीच्या हंगामात या पठारांवर विविधरंगी फुलांचा साज चढू लागला आहे. यंदा चांगला पाऊस झाल्याने पठारांवरील सौंदर्यात आणखीन भर पडली आहे. विविध रंगांची, जातीची आकर्षक हिरवी, निळी, जांभळी, पांढरी रानफुले मन मोहून घेत आहेत. गुहा असलेल्या डोंगर माथ्यवार व बसुदेव मंदिराच्यावरील पठार फुलांनी बहरले आहे. 

हेही वाचा - कोल्हापूर जिल्हा परिषदेतून आरोग्याचे कोवीड योध्दा पुरस्कार वादात ; वशिलेबाजी झाल्याचा आरोप -

पठाराने जणू विविध रंगांचा शालू पांघरला आहे. या पठारांवरून परिसरातील निसर्गाचे मनाला मोहित करणारे दृश्य पहावयास मिळते. उन्हाळ्याच्या सुट्टीत येथे असलेला रानमेवा चाखत डोंगरातील झाडाझुडपांच्या सानिध्यातुन पायवाटेने या पठारांवर जाता येते. पंडिवरे येथे अनेक शतकापासुनच्या गुहांचे दर्शन होते. गुहेतील रचना व शिवलिंगाची रचना यावरून हे प्राचीन असल्याचे दावे येथील ग्रामस्थ करतात.

संपादन - स्नेहल कदम