दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची पाच पाकळी सोहन कमळ पुष्पातील महापूजा

निवास मोटे
Wednesday, 21 October 2020

यमाई मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम झाल्यानंतर दुपारी बारा वाजता हा सोहळा पुन्हा मुख्य मंदिरात आला.

जोतिबा डोंगर (कोल्हापूर) : श्रीक्षेत्र जोतिबा डोंगर ता.पन्हाळा येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची आज शारदीय नवरात्र उत्सवातील पाचव्या  दिवशी सकाळी पाच पाकळी सोहन कमळा पुष्पातील महापूजा बांधण्यात आली. ही पूजा समस्त दहा गावकर व पुजारी यांनी बांधली . चोपडाईदेवी वाघावर रुढ असणारी महापूजा बांधण्यात आली .जोतिबा डोंगरावर  यंदा कोरोनाच्या संसर्गामुळे हा सण साध्या पद्धतीने साजरा केला जातोय.

 आज सकाळी दहा वाजता मानाचा उंट,  घोडा सर्व देव सेवक यांच्या उपस्थिती मध्ये धूपारतीचा सोहळा ढोल ,पिपाणी, सनई यांच्या गजरात मूळमाया श्रीयमाई मंदिराकडे गेला.
यावेळी देवस्थानचे अधिक्षक महादेव हिंडे श्रीचे पूजारी ग्रामस्थ उपस्थीत होते . सकाळी  हा सोहळा ज्योतिबा मंदिर ते मुख्य पायरी रस्ता मेन पेठ सेंटर प्लाझा या मार्गावरून गज गतीने गेला. या वेळी गावातील सुवासिनी महिलांनी सडा रांगोळी काढून या सोहळ्याचे स्वागत केले. या सोहळ्यात सहभागी असणाऱ्यांना काही ग्रामस्थांनी सुगंधी दुधाचे वाटप केले.

हेही वाचा- भाविकांविना सजला ललिता पंचमीचा सोहळा ; श्री अंबाबाईची गजारूढ रूपात पूजा

यमाई मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम झाल्यानंतर दुपारी बारा वाजता हा सोहळा पुन्हा मुख्य मंदिरात आला. त्यावेळी  प्रवीण डबाणे यांनी तोफेची सलामी दिली. व या सोहळ्याची सांगता झाली. यंदा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने मंदिर व परिसरात आधुनिक पद्धतीची विद्यूत रोषणाई केल्यामुळे सर्व परिसर उजळून निघाला आहे. रात्रीच्या वेळी हा नयनरम्य देखावा पाहताना मन प्रसन्न होत आहे. शुक्रवारी जोतिबा देवाचा जागर आहे.

संपादन- अर्चना बनगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: navratri festival five petal Sohan lotus flower of Jyotiba kolhapur