कोल्हापुरातील 'त्या' दोन्ही मृतांची कोरोना चाचणी निगेटीव्ह 

Negative corona test of both deaths at kolhapur corona virus
Negative corona test of both deaths at kolhapur corona virus

कोल्हापूर - येथील सीपीआर रूग्णालय व खासगी रूग्णालयात काल मंगळवारी एकाच दिवशी दोन कोरोना संशयित व्यक्तींचा मृत्यू झाला होता. त्यांचे स्वॅब पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू परीक्षण प्रयोगशाळेकडे पाठविले होते. त्याचा कोरोना तपासणीचा अहवाल आज निगेटीव्ह आला आहे. त्यामुळे या दोन्ही व्यक्तींचा मृत्यू कोरोनामुळे झालेला नाही. ही बाब स्पष्ट झाली आहे, अशी माहिती सिपीआर प्रशासनाकडून देण्यात आली. 

कोल्हापूर शहरातील कदमवाडी परिसरातील एका खासगी रूग्णालयात 81 वर्षाच्या आजींवर उपचार सुरू होते. त्यांना हृदयविकाराची लक्षणे दिसत होती. त्यांच्या काल मृत्यू झाला. तरीही खबरदारीचा भाग म्हणून त्यांचे स्वॅब कोरोना तपासणीसाठी पाठविले होते. 

हातकणंगले तालुक्‍यातील दुसरा एक तरूण गेली दोन दिवस खासगी रूग्णालयात उपचार घेत होता. त्यालाही गंभीर अवस्थेत सीपीआर रूग्णालयात कोरोना कक्षात उपचारासाठी दाखल केले होते. त्याचाही स्वॅब कोरोना तपासणीसाठी पुण्याला पाठवला होता. त्यानंतर या तरूणाचा सीपीआरच्या कोरोना विलगीकरण कक्षात मृत्यू झाला. 


या दोन्ही मृत व्यक्तींचे स्वॅबचे अहवाल आज बुधवारी सीपीआर प्रशासनास प्राप्त झाले. दोन्ही स्वॅब निगेटीव्ह आले आहेत. त्यांना कोरोना झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 
- डॉ. उल्हास मिसाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com