मोठी बातमी- कोल्हापुरात कोरोना रूग्णांची संख्या सहाशेजवळ, आणखी २८ जण पाॅझिटिव्ह

new 28 corona positive case in kolhapur
new 28 corona positive case in kolhapur
Updated on: 

कोल्हापूर - जिल्ह्यात कोरोना रूग्णांच्या संखेत दिवसेंदिवस वाढ होतच आहे. काल दिवसभरात तब्बल ६८ रूग्णांची वाढ झाल्यानंतर नुकत्याच हाती आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आणखी २८ रूग्णांचे अवहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. या २८ रूग्णांसह जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या आता 590  वर पोहोचली आहे.

कोल्हापुरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आता सापडलेल्या २८ रूग्णांपैकी 15 पुरूष, 13 महिला असून त्यातील 6 गडहिंग्लज, 10 कागल, पाच भुदरगड तर करवीर, शाहूवाडीतील प्रत्येकी एक, आजरा दोन, उर्वरित शहरातील आहेत.

आजर्‍यात काेराेना बाधितांची संख्या वाढती; अर्ध शतकाकडे वाटचाल दरम्यान, आजरा तालुक्यात काेराेना बाधितांची संख्या वादत आहे. काल रात्री शनिवारी ( ता. ३०) उशिरा प्राप्त अहवाला नुसार काेराेना बाधितांचा आकडा ४१ वर पाेहचला आहे. तालुक्याची वाटचाल अर्ध शतकाकडे सु्रू आहे. काल श्रृंगारवाडी येथे तिन रुग्ण आढळले. हे एकाच कुटुंबातील आहेत. सात दिवसांआधी या कुटुंबातील युवतीचा अहवाल पाॅझिटिब्ह आला हाेता. काल तिची आजी, बहिण, भाऊ यांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. त्यामुळे या गावात रुग्ण संख्या ६ वर पाेहचली आहे. चिमणे या गावात एका तरूणाचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. ताे मुंबईहून परतला हाेता. येथे बाधितांची संख्या ४ झाली आहे. बहिरेवाडीत दाेघांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. हे दाेघे तरुण मुंबईहून पंधरा दिवसांआधी गावी आले हाेते. सर्वाना आजर्‍यातील काेविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

काल सेवानिवृत्त पोलिसाचा मृत्यू

सीपीआरच्या कोरोना कक्षात जलद्याळ (ता. गडहिंग्लज) येथील सेवानिवृत्त पोलिसाचा काल सकाळी मृत्यू झाला. ते मुंबई पोलिस दलातून निवृत्त झाले होते. मृत्युपश्‍चात त्यांच्या स्वॅबचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बळींची संख्या पाच झाली आहे. दरम्यान, काल दिवसभरात जिल्ह्यातील आणखी ५५ जण बाधित असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या ५६२ झाली आहे. त्यातील दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात १४ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या.

आता कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १३२ झाली आहे. एकूण ३९१ व्यक्तींचे स्वॅब अहवालही निगेटिव्ह आले आहेत. आज आढळलेल्या बाधितांमध्ये सर्वाधिक २५ रुग्ण गडहिंग्लज तालुक्‍यातील आहेत. पाठोपाठ कागल तालुक्‍यातील १२ व्यक्ती बाधित आहेत. अन्य पन्हाळा, शाहूवाडी, आजरा तालुक्‍यात १ ते ६ बाधित आढळले. बाधित आढळलेल्या व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात होत्या. त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, संबंधित पोलिस कर्मचारी निवृत्तीनंतर मुंबईतच वास्तव्यास होते. मुंबईत कोरोनाचा धोका वाढल्याने ते गडहिंग्लज तालुक्‍यातील आपल्या मूळ गावी आले होते. ते गावाबाहेरील शेतात असलेल्या घरात क्वारंटाईन होते. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले होते. दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती गंभीर होती. दरम्यान, त्यांची पत्नी व मुलाचा स्वॅब अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे चिंतेत भर पडली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Raju Shetti's aggressive demand to give first installment of Rs 4,500
Bonus of Rs 117 crore to 5 lakh farmers by Gokul right in Diwali
Gokul Chairman Election Dispute in Kolhapur
Pune Bengaluru Highway Accident